धरो तें चावस सोडं तें पयेसं

धरो तें चावस सोडं तें पयेसं


नानाभाऊ माळी
…..मी परोंदिन सातारा जिल्हाम्हा ‘वसंतगड’लें जायेल व्हतू!छत्रपती शिवाजी महाराज यासना ‘सरसेनापती हंबीरराव बाजी मोहिते’ यासनं गाव ‘तळबीड’ याचं
वसंतगडनां पायथाले सें!आम्हीं गड चढी ऱ्हायंतुत!घाम यी ऱ्हायंता!किल्लालें जावानां आडा हुभा रस्ता व्हता!दगडेस्ना कच्चा रस्ता!त्याम्हा किल्लानां पोटे पोटे तो रस्ता व्हता!वाकी-उकी,दम ल्ही किल्ला चढी ऱ्हायंतू!मधमाचं मन्हा मोबाईल
वाजना!किल्लानां पोटले एक दगड धरी हुभा ऱ्हायनु!फोन उखला!… तथायीन आवाज उना,’ दादा आयकानां आम्हना पोरें पारोयातून नींघेलं सेतस!कालदिन सक्कायम्हा पूनालें यी लागतीन!तुम्हनाकडे एक काम सें!आम्हीं एक सरकारी जनजागृतीनं पथनाट्य बठाडेलं सें!काल्दीस्ना यांय तुम्हना वयेखनां एखादा कलाकारव्हयी तें दिशातं का?’💐

मी तें किल्ला चढी चढी,दम लागी थकी जायेल व्हतू!हुभा ऱ्हायी आयकी ऱ्हायंतूं!थंडी वार्गी सुटनी व्हती!आंगन्हा घाम पयी ग्या!फोनवर मी आयकी ऱ्हायंतूं!फोन करणारा कोण?कोठला?इचार करा नयी!पन आपला गावना सें त्याले हा सांगी मोक्या व्हयी गवू!इसावा भेटना व्हता!आखो हात पायस्मा जोर उना!नवा दम उना!किल्लानां पोटे-पोटे जोर लायी किल्लावर चढायी सुरु करी व्हती!💐

किल्लावर चढता चढता चांगलाच घामलायी गयतूं!झामलायी भी गयतूं!जिद ऱ्हायनी तें बठ्ठ जिकायी जास!मनन्ही तयारी जोईजे!.. किल्ला चढी उतरी उनुत!किल्लानी चढायी आनी परवास जिदना व्हता!रातले, हडपसरलें घर भिडता भिडता साडे दहा वाजी ऱ्हायंतांत!तितलाम्हा फोन उना,’आयका नां!तुम्ही दखा का एखादा पोऱ्या?’!… मी तें हायी इसरी गयथू!मी बोलनू,’नई भो!आजनां या पया पयम्हा मी इसरी गवू मी!’
तथायीनं त्या जीवान्ही सांग,’नयी भेटना व्हयी तें तुम्ही भी चालश्यात!एकचं दिनन्हा प्रश्न सें कालदिन आम्हना गडी यी जायी!’

त्यान्ह तें आयकी रातना
थंडीम्हा भी मन्हा आंगल्हेचं घाम फुटना!मी!!!आनी पथ नाट्यम्हा!!बय कधय टेजवर चार सबद बोलेल नई मी!!आनी हावू जीवान खुशाल चार लोकेस्मव्हरे नाचाडी ऱ्हायना?मी त्याले नयी सांग!पन त्यान्ही काकूंयीदिनी रावनायी दखी मन्ह मन पघयी गये!आपला गावना सें!हेंगड वाकडं,जसं जमी तसं करुत आशी म्हनीस्नी हा सांगी दिन्ह!मी तंवयनं तव्हयं,रातना साडे दहालें,मन्हा मित्र उदयभान पाटील यांसले फोन लावा,’पाटील साहेब आपले कालदिन रावेतले जानं सें!जाता जाता पुनाम्हा एक ठिकाने आपला गावना
जीवानन्ह काम सें!तें १०-१५ मीटांनं सें तें उरकी जाऊत मव्हरें! कामम्हा काम व्हयी जायी!एक जनलें
कामम्हा उनुत यान्ह पुण्य लाभी!’त्यास्नी हा सांग!रातले निचितवार जपी गवू!💐

कालदिन सक्कायम्हा त्या जीवानन्हा फोन वाजना,’काका आयकानां!तुम्ही यी ऱ्हायनात नां!आजनां दिन समायील्या कालदिनफायीन मन्हा मानसे यी ऱ्हायनात!’ मी इचारम्हा पडी गवू!बय,आयका आयका करता करता मी ‘काका’ कतायीन व्हयी गवू? मन्हा डोया हुघडनातं!व्हाट्सअपनां dp वर या जिवानन्ही मन्हा फोटूक दखा व्हयी बरं!त्या जीवानलें सांग,’मी निंघी ऱ्हायनु येवालें!’ ११वाजता शिवाजीनगरलें सांगेलं ठिकाने,सरकारी हाफिसनां ठिकाने गवूतं!तठे तें जिमीनं सफाट व्हयेलं दिखनी!नवीन बिल्डिंगगुंता खंदायी चालू व्हती!आथ तथ इचार तें म्हनें ‘हायी हाफिस तथ इस्रान्तवाडीलें चालनं जायेल सें!हेरफाटा मारत आखो तठे गवूतं!तठे त्या जीवानन्हा पत्ता नयी व्हता!💐

मी फोन करा ‘कारे भो कोठे सें?’तें तोच माले इचारी ऱ्हायंतां,’तुम्ही कोठे सेतस? माले तें हाफिस माहीत नयी?पत्ता धाडी द्या!’ दखा!त्या जीवानलें हायी हाफिस भी माहीत नयी? काय करो बवा?त्याले डायरेक्ट लोकेशन धाडी दिन्ह!भावड्या रिक्षा करी जेमतेम पोहचना!संगे दोन जन
दिखनातं!शोले पिच्चरम्हाना
गब्बरसिंग जोडीदार सारखा दिखानातं!धाकल्ला पोरें व्हतात!पन दाडी खुगटेलं व्हती!दखालें मारक्या बैलनी मायेक व्हतात!दोन्ही पोरें रातले पारोयातून रेल्वेम्हा तिकीट काढीस्नीभी तनंगीं-तुंनंगीं बठी यी भिडनातं!त्यास्ना अवतार दखी सैराट सिनिम्हानां परश्या दिखी ऱ्हायंतांत!…ठिक सें!तठेंग सिधा त्या जीवानन्ही हाफिसम्हा घुसो नां?पन नई!आखो कोन तरी यी ऱ्हायना आसं सांग!साडे अकरा, बारा, एक वाजी ग्यात तवलुंग वाट दखानं चालू व्हतं!💐

त्या टाईमम्हा तेथेच त्या हाफिसनां आंगे,पथनाट्यनी प्रॅक्टिस सुरु करी दिनीं!लोके यी जायी ऱ्हायंतातं!आम्हीं आम्हनां नांदम्हाच व्हतुत!डायलागबाजी,हातवाऱ्या करी प्रॅक्टिस चालू व्हती!पन दुसरा कोन येणारं सें तो काय यी नई ऱ्हायंता!हावू जीवान फोनवर बोली ऱ्हायंता!उलटं सिध बोलनं चालू व्हतं!दिड वाजी ग्यात तरी भी येणारा भावड्या उना नयी!मंग या जीवानन्ही माले सांग,’आयकानां काका!जो यी ऱ्हायना नां त्यानी गाडी तथी दांडेकर पूलफान आटकी जायेल सें!त्याले आथ येवान समजी नई ऱ्हायनं!आपुन जायीस्नी लयी येऊत!’ मी या जीवानन्हा गंम दखतंचं ऱ्हायनु!एक तें गणपतीना दिन!त्याम्हा वन वे ट्रॅफिक!आठेगं ‘तें’ ठिकानं नेम्मन १२किलोमीटर व्हतं!पन जीवान आडेल व्हता!मन्हा मानोस्कीनां झिरा जित्ता व्हता!त्याले गाडीवर बसाडी पर्वती पायथाले गवू!तठे हावू जीवान त्या येल जिव्हाननीं मोठी गाडीवर बठनां!मी मव्हरे गाडी चालावू त्या मनमांगे यी ऱ्हायंतांत!ट्रॅफिकम्हा फसी फुसी आडीच वाजता त्या हाफिसम्हा उनुत!मंग या जीवनलें हाफिसम्हा जावानी जाग ऊनी!

आम्हना आंगवर पथ नाट्यनां कपडा घाली दिनात!त्याचं अवतारम्हा माले हाफिसमां लयी ग्या!त्या कपडास्मा मी तें तमासाम्हाना ढोलकीवाला वाटी ऱ्हायंतूं!हाफिसम्हा गवूतं!कोठे कोठे तें नाट्य करन व्हतं त्या ठिकाने तें हाफिस सांगणार व्हतं!या जीवानन्ही ज्यांनी कॉन्ट्रॅक्ट लेयेल व्हता त्याले फोन लावा!तथायीन फोनवर सांग आलाना फलांना हाफिसरलें भेट!तो हाफिसर भायेर जायेल व्हता!मंग दुसरा हाफिसरलें भेट! तो साहेब भी मिटिंगलें जायेल व्हता!मंग तठेंग आम्हनां मोर्चा एक मॅडमनांगंम
वयनां!कागदे तपासाम्हा चार वाजी ग्यात!आते ऊनी का नई पंचांयीत? सक्कायस्ना भुक्या ठोकलायेलं व्हतुत!चार वाजी ग्यात!तरी भी आम्हीं गाडीवालालें लेवालें गवूतं तव्हयं आम्हना मित्र पाटील साहेब यास्नी त्या दोन पोरेसले नास्ता पानी दिस्नी तात्पुरती भूक भागाडी व्हती!चार वाजी ग्यात!आम्हले तें रावेतलें जानं व्हतं!महत्वान काम व्हतं!मी त्या जीवानलें सांग,’दादा आम्हीं
गवूतं तें चाली का? आठे परवानगी कव्हयं भेटी!पथनाट्य कव्हयं व्हयी? तुम्ही या कामे पहिलेंगथीन उरकी लेवो नां?’.. जीवान बोलना,’काय सांगो काका मी भी आठे पहिलेंग उनू!’मी डोकालें हात मारी लिधा!या जीवानन्ही वयेक नई!पायेक नई!पन आपला खान्देशी भाऊ सें पयेत उनुत!💐

मी आनी मन्हा मित्राले नेम्मन जठे जान व्हतं तठला फोन उना!साडेचार व्हयी जायेल व्हतात!आम्हीं सांग,’ गवूतं तें चाली का दादा?’.. जीवान बोलना जाता जाता आंगवरना कपडा उतारी जावा!’मी चमकायीस्नी
त्यानंगंम दखालें लग्नू!तो हासत बोलना,’काका पथ नाट्यना कपडा उतारी जावा!तो तठेचं हाफिसम्हा व्हता!आम्हीं खाले उनुत!त्या पोरे भी कपडा घाली सजेल व्हतातं!मी कपडा काढी त्यास्ना हातम्हा दिन्हा!गाडीले किक मारी आनी रावेतलें पयेत सुटनूत!एक मन्सा आपोरी ऱ्हायी गयी!पथ नाट्यम्हा काम करता उनं नयी!… रातले रावेतथून हडपसरलें निंघी ऱ्हायंतुतं!मी मांगला सीटवर व्हतू!मन्हा फोन खन खन करी ऱ्हायंता!रातना आंधाराम्हा मी मांगला सीटवर बठी फोन उखला,’ हैलो!आयका नां काका!कालदिन मंगयवार सें!काल्दीस्ना दिन पथ नाट्यलें यीशात तें बरं व्हयी!तुम्हनं काय व्हयी तें मानधन दि टाकसू!’मी त्यान्हा त्या सबद आयकत ऱ्हायनू ‘तुम्हनं फायनल सांगा!तुम्हनं मानधन दि टाकसू!’…. मी येडांगत हासत ऱ्हायनु!मी फोन कट करी दिन्हा!… आज मंगयवार सें!.. त्यास्न पथ नाट्य जोरमा चालू व्हयी!मी जसं सोताचं काम करी ऱ्हायनु आशी वाटी ऱ्हायन!💐
💐💐💐💐👏💐💐💐💐
****************************
नानाभाऊ माळी
मु.पो.ता.शिंदखेडा,जि.धुळे
(ह.मु.हडपसर,पुणे-४११०२८)
मो.नं-९९२३०७६५००
७५८८२२९५४६
दिनांक-२६ सप्टेंबर २०२३

1 thought on “धरो तें चावस सोडं तें पयेसं”

Comments are closed.