जीव लावा मायबाप्ले

जीव लावा मायबाप्ले

रचनाकार- शिवाजीआप्पा साळुंके
च्याईसगाव- जि. जयगाव.

“आप्पा” पित्तरपाटाले”
माफी मांघस मन्थीन
दोन्ही हात जोडीसनी
माफ कर मनथीन

तू ते हायातभरबी
लिन्हा नयथा ईसावा
माले मन्ह्या चुकासना
आते व्हस पसतावा

चाला-बोलाले शिकाडं
श्यायाम्हान माले धाडं
म्हनीसन व्हडंस मी
मन्हा सौसारनं गाडं

खोट्यानाट्या गोस्टीसना
राग भूच व्हता तुले
चोरी चहाडी चुघली
करु नई दिन्ही माले

तंगी तुंगी र्हाये तरी
माले कळू दिन्हं नई
कर्जमिर्ज काढीसनी
हौस मन्ही पुरी कई

माले सुखी दखासाठे
कित्ला कया आटापिटा
पायम्हान रुतनात
दग्डे-दुग्डे काटा-कुटा

माले नौक्री लागासाठे
घर-दार टाकं ईकी
मन्हा लगीनम्हा तुन्ही
सोनं-नानं दिन्हं फुकी

तरी तात्या मन्हा डोया
व्हता वावर्मयावर
सम्द दिन्ह लिखी तुन्ही
मन्हा एख्लाना नाव्वर

तुन्हं दुखनं-खुपनं
कधी माले सांगं नई
मी तरास दीन्हा तरी
राग मन्म्हा धरा नई

धन्य धन्य झाई तुन्ही
लाख मोल्नी जीनगानी
आसू येतंस डोयास्म्हा
काईजनं व्हस पानी

तुन्हागत वाग्सू-बोल्सू
तुले वचन मी देस
लेकरेस्नी जिम्मेदारी
निभाडानी आन ल्हेस

भावड्यासहोन दखा
जीव लावा मायबाप्ले
रावनाई करीसनी
शिवाआप्पा सांगे जग्ले

पित्तरपाटाना सन
वज्जी आवडंस माले
आप्ला वाडवडलेस्नी
याद देस सम्दासले

शिवाजी साळुंके, ‘किरन’.

हाल्ली मुक्काम- छत्रपती संभाजीनगर.

1 thought on “जीव लावा मायबाप्ले”

Comments are closed.