गर्भार झायी माती

अहिराणी कवीता

गर्भार झायी माती
बाप आभाय दखत जाये
खाये खुडा भाकरनी न्हारी
माय घाम पुसत ऱ्हाये

माय बापनी जोडी
धरे वावरनी वाट
खळखळ वाहे पाणी
जसेकाई गाणा म्हणे पाट

पाय मातीमा रूतेत
बिलगे आंगले माती
दाना सोनाना पिकेत
दिसे जशा माणीक मोती

बाप संगे राबस माय
तिना कष्टाळू जीवडा
तिन साधंसुधं जगणं
व्हडस ती संसारना गाडा

भारा सरसर कापे माय
धस पाय घुसे
नै डोयामा आसु तिना
लेकरू धरीधरी हासे

माय भोयी भाबडी
बाप जीव लावस
बापन्ं फाटक धोतर
माय दोन खांडन् लुगडं नेसस्

मायना कंपायवर कुंकू
जशा चंद्र दिखस
तिना जिवलगा संगे
ती दिन रात राबस

बाप कशा देवमाणूस
जीव लावस भलता भारी
मायना डोकावर्ला पदर
देस मनले उभारी

संजय धनगव्हाळ
(अर्थात कुसूमाई)