खान्देशी अहिराणी कथा गाव डवऱ्या

खान्देशी अहिराणी कथा गाव डवऱ्या

Khadeshi Ahirani katha

. . . ” गाव डवऱ्या ” … ऐ ss आबाव ‘ … आबा ss .. ऐ आबा … कथा चालनारे राम पाह्यरामा .. ? बये आबा ‘ अस्सा खव्वयनाना त्यानावर मायन्यान कदी भो काय सांगु तुम्हले ?

” ओ ss रिक्कामा गाव डवऱ्या ‘ तुले काई काम शे का रे ? का असा सुना सांड सोडी दिना तुले . . ? कोनी कोठे कामले जास कोनी कोठे जास … दिनी नाट लाई भडवानी … ”

आबा अस्सा उफडना त्यानावर ते इचारू नका . डाफरा सारखीच गोट व्हती ना हो .. तरी तो डवऱ्या बोलीच पडना त्यानावर . ” कोनती महत्वानी गोट व्हती तुनी ते मी नाट लाई दिनी ? काय रे ओ ss .. बयना पैखाट्या ते येचाले चालना … नी म्हने नाट लाई दिनी ”

तवसामा आबानी ढेकाये उचलं नी ” निंघस का नई आठेन भडवा ” आबा ते त्याले मारू का मारूच करे . गोट बी तशीच व्हती ना … काय झाये रुखमा बोय नी नात व्हती सोनगीर वघाडी नी . पोर नाके डोये चांगली व्हती .

तिकोन्या ना वावरमा तिनं एक येल नं घर व्हतं . तठेच पोरले दखाडी देवो गावमा कोनले हाक नई नी बोंब नई म्हनीसन आबा चाक्पाक धव् य्या ठग बनीसन ‘ डोकाले तेल बील लाईसन चालना व्हता . म्हनीसन डवऱ्या ले शंका ऊनी हाऊ मनमा कथा गाजरे खाईसन जाई राह्यना . आबा ले नाट लागी गई म्हनीसन तो डाफरी राहयंता असा हाऊ गाव डवऱ्या व्हता .. याले काय पडेल व्हतं बरं ! कोनी कथं बी जावो . . नई का ?

बरं का मंडई ‘ आम्हना गावमा एक आस्सा आप्पीत्तर व्हता ईचारू नका तुमीन .. नई ते तुमीन कथा ईचाराले येवाव शेत म्हना . पन म्हंतस बुवा … तो भलताच आगजाई व्हता तो . कथा डुकरेसले हाकली ‘ ते कथा म्हशीसनं गव्हारं पार खल्ली बल्लाना हेटला आंगे हाकली ये . . .

तो गन्हाईना चारनारा आपला गव्हारासले दखी दखी येडा व्हई जाये . कथा उखल्ला चाफली ‘ कथा बकऱ्यासना मांगे लागी . असा व्हता तो . म्हनीसन लोके त्याले डवऱ्या म्हनेत . त्याले वरजनाराच कोनी नई व्हता . बाप धाकलपनेच देवले प्यारा व्हई गयथा . माय व्हती बिचारी पन ती बी कवलोंग त्याले आवरी हो ? कट्टाई जाये बिचारी … त्यानावर धाकच असा नई व्हता . कदी बोरेसना झाडेसले तनगी ते कदी चिचा पाडी . ऊसना मेर मा घुशी जावानं मस्त ऊस तोडी लेवाना आनी गावमा खात खात येवानं … दुसरं काय काम व्हतं त्याले . . शाया ? सातवी लोंग शिकना व्हता तसा . पन मातर तो डोकाना तल्लख व्हता बरं ! पन बाप जावा पासुन हुदडा शिवा त्याले काईच आवडे नई . असा हाऊ गाव डवऱ्या व्हता .

चालता मानुसले नाट लाई दे तो . एकदा काय झाये त्या गावमा तानक्या व्हता . त्यानी एक बोकड्या लिना व्हता . चैतमा मांता करता बोकड्या ईकत लिना व्हता . त्याले तो रोज खावाडे पेवाडे हिरवा हिरवा चारा खाऊ घाले .

तयार व्हवाले जोयजे . हाई गोट कोठे डवऱ्या ना ध्यान मा ऊनी . त्यानी बोकड्याले सोड आनी गावना दूर पार बल्लाना येठला आंगे सोडी ऊना . तानक्या सक्काय उठीसन त्याले चारा पानी दखाडाले ग्या पन कोठे शे बोकड्या ? अथा तथा दखं ‘ कोठे शे बोकड्या .. ? काई पत्ता नई . पन सांगनारनी तनक्याना कानमा बरबर सांग .. बये डवऱ्या ले तानक्यानी शेमटीवरी शेमटीवरी असं शेफालं ते ईचारू नका . अस्सा हाऊ डवऱ्या व्हता . तो गावमा काई ना काई उपाद्या लईच ये .

पन एक गोट मातर खरी बरं . . तो चोर्‍या माऱ्या नई करे . जीत्ता बोकड्या ले मारतस या त्याना मनले हाई गोट पटे नई … तो डवऱ्या व्हता आख्ख गाव भवडे पन खोट ‘ नाट त्यानापा नई चाले . तसा तो सातवी म्हातला हुश्शार पोरगा . व्हता . पन बाप ग्या तशी त्यानी शाया सुटी गयथी . तसा पुस्तकेसना संस्कार त्यानावर व्हयेल व्हतात . काई गोष्टी त्यान्या चांगल्या व्हत्यात . धल्ला पल्ला म्हतारा कोतारा यासना तो कायम आदर राखे . मदत करे … सेवा करे .

त्या गावमा एक मास्तर व्हतात . त्या नुकताच रिटायर व्हई जायेल व्हतात . एक दोन एकर खेती व्हती जुग बटाई खाल देल व्हती . गुरुजीना आंगे ना मांगे कोनीच नई व्हतं .

एकदा काय झाये गुरुजीसनी त्याले दुध आनाले सांग . मंग तो रोज गुरुजी कडे येवाले लागना . त्यासनं आंगन झाडी दे ‘ घर झाडी दे . त्यासनं डोकं चेपी दे ‘ हातपाय दाबी दे .. या गोष्टी मातर त्याना पा चांगल्या व्हत्यात . माय त्यानी कायम त्याले अशा चांगल्या गोष्टी सांगत राहे . तो लांड्या लबाड्या ‘ चोरी चपाट्या कदीच करे नई . पन गावमा तो मातर डवरतच राहे . त्यानी xx एक जागावर कदीच ठह्यरे नई .

पन त्यामा झाये काय मास्तर एकदा खूप आजारी पडनात . फनफनात ताप व्हता . त्याले कयनं . डवऱ्या पयतच गावना डाक्टरले लई ऊना . त्यानी मास्तरनी भलती सेवा कई . हातपाय चेपी दे . डोकं दाबी दे . सोयताना हातवर आलं घाली च्या करी दे . भांडा कुंडा घशी दे . गोया बरबर ये वर दे घाम ऊना का फडकावरी पुशी दे .. कोमट पानी करे रुमाल वरी मास्तर नं आंग पुशी दे . भलती सेवा त्यानी कयी . मास्तर नी त्याले प्रेम देल व्हतं शिकवन देल व्हती त्याले सेवा करानी मोठी संधी भेटनी व्हती . आते मास्तरले बरं वाटाले लागनं व्हतं . डवऱ्या वर त्यासनी माया जुडी गयथी . मास्तर रोज त्याले धरी बठेत . रामायन महाभारतनी गोष्टी सांगेत . त्यानं मन आते बरच परिवर्तीत झाये व्हतं . चांगला परिणाम झाया व्हता . मास्तर त्याले उपदेश करेत . त्याना मनवर चांगलाच फरक पडी गयथा . त्याले मव्हरे शिकाडा करता मास्तरनी त्याले तयार कये . पह्यले तो नई म्हने . गावमा डवरानी सवय . ती जाये का ‘ पन मास्तर नी त्याना डोकाम्हातला कांदा बटाटा भरेल व्हतात त्या बठ्ठा साफ करी टाकात . त्याले शिक्सन नं महत्व पटाडी दिनं .

मास्तर ना आंगे ना मांगे कोनीच नई व्हतं . सहेरमा एक बहीन व्हती . तिना पा त्याले शिकाडाले तिनी त्याले धाड् . पंधरा दिन झायात मंग मास्तरनी सोयता सहेरमा जाईसन त्याले बोर्डिंगमा टाक . शायना ड्रेस ‘ दप्तर ‘ पुस्तके वह्या बठ्ठ मास्तरनी खर्च करीसन त्याले ली दिनं . मास्तरले त्यानी हुशारी कयनी व्हती . तो वाया चालना व्हता . हाई गोट मास्तरना ध्यानमा इ गयथी . एक ते त्यानावर त्यासना लया लागी गयथा . गुरुजी ले कोन व्हथ ? डवऱ्या सातवी पास व्हता . सातवीमा चांगला मार्क व्हतात . त्यानी हुशारी दखीसन मास्तरनी त्याले शिकाडाना निर्णय लिना . मास्तरनं त्याना वर पुरं ध्यान व्हतं . सोयता शायमा जाई येत . त्याले समजाडी सांगेत . त्यास्ना प्रेम आनी मार्गदर्शन मुये त्यानी चिकाटी सोडी नई . चार वरीस कथा गयात पत्ता लागना नई . बोर्डाना परीक्षामा दहावी तो खूप चांगला मार्क खाल पास झाया . मंग त्याले कॉलेजमा टाकं . तो ग्रॅज्युएट झाया . मास्तरनं पुरं ध्यान त्यानावर व्हतं . तो हुश्शार व्हता . वाया चालना व्हता परिस्थिती मुये त्याले काईच सुधरत नई व्हतं . हाई गोट मास्तरना ध्यानमा ई गयथी .

मव्हरे मंग त्यानी यु . पी . एस् . नी परीक्षा नी तयारी कयी . तो जिल्हामा अव्वल ऊना . आते तो मोठ्ठा अधिकारी झाया व्हता . ऑफिसनी गाडी ‘ बंगला ‘ नोकर चाकर त्याना रुबाबच बदली ग्या . शिक्षन मुये त्यानी प्रगती झायी . दगड व्हता तो पन त्याना म्हातला मास्तरनी गुन वयखात . आनी त्यानावर पैलू पाडीसन हीरा कया मास्तरनी त्याले हीरा कया हाई गोट मातर खरी .

गावमा तो त्याना सरकारी गाडीमा ऊना . गावमा . बंदोबस्त लागना . हाई दखीसन लोके तोंडमा बोटे घालाले लागनात . घर ऊना मायना पाय पडना . मायना डोया भरी ऊनात . बाशी भाकरना तुकडा आनी पानी ओवाडाले माय मातर इसरनी नई . मायच ती असा गालवर आसू वघयेत . त्या आननना आसू व्हतात . मास्तरना पाय पडना . गावना ‘ लोकेसनी त्याना मोठ्ठा सत्कार कया . जंगी सत्कार क्या त्याना . आज जो गावना डवऱ्या व्हता तो लोकेसन हार तुरा ना स्विकार करी राह्यंता . जवय तो माईकवर ऊना तवय तो बोलना ” मी कलेक्टर नई अजुनबी तुमना माले ‘ गाव डवऱ्या ‘ च समजा . आख्खा लोके हासाले लागनात .

व टाया वाजीसन त्यानं जंगी स्वागत कये . आख्ख गाव त्या दिन सजेल व्हतं पताका ‘ सडा रांगोळ्या हाई दखीसन डवर्‍यानं मन भरी उनं . त्याना नशीबमा मार्ग . दखाडाले मास्तर भेटनात म्हनीसन या दिन त्याले दखाले भेटनात . मंडई ‘ शिकशन शिवा पर्याय नई हाई तितलच खरं . . ! बरं मंग मंडई … येस ..!

राम राम ..!

विश्राम बिरारी ‘ धुळे . 955 2074343 …………

2 thoughts on “खान्देशी अहिराणी कथा गाव डवऱ्या”

  1. माझ्या काही अहिराणी कथा आहेत. आवश्य वाचा.
    १)जिवनज्योती
    २)वार्यावरचं पाखरू
    ३) बाप झाया वैरी
    ४)माय मरो पण मावशी राहो
    ५) आगे मवाय
    ६) जत्रा
    ७)सावतर माय
    ८)मना‌ गाव, मना देश

Comments are closed.