अहिराणी भाषा कवीता बायजा काकून दुःखण
बायजा काकून दुःखण
अहिराणी रचना
घरणा दारणां सोडी गयात
जगणं कोणी सोडं नही
एकटाच येस एकटाच जास
घरणं कोणी जात नही
सगळाच राहातसं आपला
जोवरं आपला खिसा गरमं
कोणा सगा कोणा सोयरा
वावरं कोयडं बांधले धरणं
ताईडी मनी भावड्या मना
जोवरं फूकटनी कंदूरी राही
जलम जावळं व्हयनात बंद
जवळ कोणी फिरकत नही
त्याना मतलब साधा करता
दारले माटी ठीये नही
उभी नाहाडीमा परणाई गई
सोयराले उपकार राहीना नहीं
सक्की भाशी वऊ कई
नवरान मी ऐक नई
बोलणं नही म्हणंन नही
माहेरले वऊ इवळत गई
नंदा नको भाच्या नको
नवरानं गोत चालत नही
माय माहेरना इना बाडगा
रोज मोबाईलमा दखत राही
इघा बिघा कोरड बैडामा
नवरानी मनी हयात गई
जीना करता कई वण वण
तीच माहेरले चालणी गई
सण नही सराद नही
सण दिवाळी सुनी गई
भरेल घरमाईन लक्ष्मी गई
बायजा काकून दुःखण हाई
साहेबराव तात्या नंदन नाशिक