अहिराणी कवीता कोल्ली जमीन खानदेशनी
कोल्ली जमीन खानदेशनी
खानदेश नी जमीन से मनी पौथीर,
जस मनी गाय माताना गोमतिर l
पानिना गुंता सयसय बयस तीनी काया,
तरी काही येत नहीं देवबाप्पा ले दया l
झया उनन्या खायीसनी पडी गयात तिले भेगा,
असा कसा रे मेघ राजा देस तिले दगा l
जीव कसा बयस आमना मायले देखीसनी,
गावोगावन्या जमीन व्हतीस तर्रर पाणी पी सनी l
असा कोणी नहीं माय खानदेश ना लाल,
काठी झेलेसणी पाठवर करी जमीन ना उध्दार l
सरकार जे भी येस ते पाठ फिरावस,
खानदेश ना वाटा मां फुटी कवडी भी नहीं येस l
शपथ माटीनी ली सनी करूत समदा आगे कूच,
आवाज आपला एक करिनी सरकारले नमाडूत l
आवाज आपला एक करिनी सरकारले नमाडूत ll
कवी -सुधाकर भामरे बडोदे गुजरात
८.४.२०२४,मो 9313221919