अहिराणी कवीता पुरनपोयी

अहिराणी कवीता पुरनपोयी

अहिराणी कवीता पुरनपोयी

अहिराणी कवीता पुरनपोयी

पुढारेल अहिर जमातनी
वस्ती व्हती खान्देशम्हा
अहिरानी आमनी वानी
तिले तोड नही जगम्हा.

आमनी खान्देशनी संसकरती
सगया जगम्हा भारी
पाहुनचार करानी से
रीत आमनी न्यारी

जाणार नही भूक्या
दारसे येयेल पाव्हना
दिसूत पोटले टाचा
आदरसत्कार करसुत त्यास्ना.

घरले खासुत खुडाभाकर
पाव्हनास्ले करसुत पुरनपोयी
से पकवानेस्नी रानी
आमनी खान्देशनी पुरनपोयी.

रामपहाराम्हा उठी आमन्या
खान्देशीमावल्या कामले लागतीस
झाडलोट करी कुरी
पुजा करी चुल्हा चेटाडतीस.

सनसराद नि पाव्हनारावया येतस
तेरोज दाय शिजाले टाकतीस
तथी दाय शिजस तदय
आथी कनीक भिजाले लागतीस.

कनीक भिजांनबी स्यास्तर से
कितला पिठले कितला मिठ घालानं
यडीबागीनं काम नही
हायी जिले कयस ती सुगरनं.

जव्हय कनीक पासटस
तव्हय लोया भराले लागतीस
शि वरलावर शिजेल दाय
गुई घाली चिकनीचटक वाटतीस.

शिवरला धुई चुई
तठजे रसीना समार वाटतीस
लोयाम्हा पुरन भरी
पोयपाटलावरं थोड लाटतीस.

मंग लाटेल पोयी हातवरं ल्ही
कोपरभर लांबाडतीस
सुगरन मावल्या तापेल खापरवर
पोयी आध्धर टाकतीस.

चुल्हाना उब्यावर ठेयेल खापरवर
सरकायीसुरकायी खरपुस शिजाडतीस
पुरनपोयी रांधन सोप नही
पोयी उलथनं आवघड गोट -हास.

खापरवरज चवकोनी घडी करी
गेलनी डालकीम्हा नेंबन ठेवतीस
अलवार पुरनपोयी बनाडानी
खान्देशी बाईस्नी खासीयत -हास.

लोया बनाडा पासीनं
पुरनभरी लाटी खापरवरं टाकनं
खापरवरं उलथी घडी घालनं
हायी नववं नवल दुनियाम्हानं.

शिजाडेल दायनं पानी बी
त्या वाया नही घालतीस
वाटेल समार टाकी त्यान्ही
चटकदार रसी बनाडतीस.

पुरनपोयी संगे खावाले
डेराभर खिर रांधाले ठेवतीस
तांदुय शिजाडी साखर टाकी
कापुरनागत धवयीबरफ बनाडतीस.

आमन्या बाया गानाम्हा सांगतीस
” भज्या तं कयात जस्या मखमली गेंद
कुल्लाया तळील्या आसमानी तारा
पापड तयात जसा पुनीना चांद “

मंग नक्शीना पाटला टाकी
त्यास्ना म्होरे रांगोया काढतीस
ताट वाढाले ल्हेतीस
खिरपोयी रसीभात वाढतीस.

तोंडे लावाले तयेल
गरमागरम भज्यापापड -हातस
भातसंगे खावाले वरपाले
समारनी रसी -हास.

आसां पुरनपोयीना वाढा
दखीज पोट भरी जास
देव मानेल पाव्हनापयीस्ना
खायीसन आत्मा गरायी जास.

आमनी खान्देशी पुरनपोयीले
आमरीतनी चव -हास
रांधनार मावलीना हातनी मननी
गोडायी तिम्हा उतरी जास.

साधाभोया खान्देशी लोकेस्नी आसी
पाहुनचार करानी रितभात -हास
आमनी खान्देशी संसकरतीम्हा
पुरनपोयीले खासं माननं पानं -हास.

पुरनपोयी – रमेश बोरसे.
[ खान्देशी खाद्द संसकरतीची जगाला ओळख व्हावी यासाठी पुरनपोयी कविता संग्रह लिहला आहे ]

Khandeshi Ahirani Kavita

2 thoughts on “अहिराणी कवीता पुरनपोयी”

Comments are closed.