अशी मन्ही माय अहिराणी कवीता
नऊ रंगन्या नऊ साड्या नव्हती नेसत, दांड भरेल लुगडं माय व्हती रे खोसत.
नऊ दिवस करे उपास जेमतेम खाये, दिनभर माय मन्ही तरी हासतच हाये.
जवय व्हतू नादान चालू मी रांगत, लालनपालन करत माय गयी खंगत.
घाटा घुगऱ्या खावाडी माले व्हती पोसत, भयान व्हती नादारी तरी ती हाये हासत.
याद तुम्ही येता माय उर मन्हा दाटे, जथं देखो तथं मन्हं आभायच फाटे.
यान्हीत्यान्ही माय दखीन जास मी नमी, देवी देवतासपक्षा नव्हती माय मन्ही कमी.
अशी कशी माय माले गयी तु सोडी, मतलबी दुन्यासंगे गयी मन्हं नातं जोडी…
हायाती कयी रंगीत मन्ही नाना रंग भरी, तुन्हामिचूक माय शे मी किलवाना तरी.
गोड तुह्या आठवनी हायनू मी घोटी,
पवतीर तुन्हा पायले नमन कोटी कोटी.
कैलास संतोष भामरे (वाखारी) लासलगाव ९४२०७२७२८८
1 thought on “अशी मन्ही माय अहिराणी कवीता”
Comments are closed.