माय मावशी
माय मन्ही अहिरानी
मना घरमा व्हती
शाळात शिकाडाले
माले मावशी व्हती
माय मावशीना
संस्कार मनावर
प्रेम मन्हं सारखच
माय मावशीवर
माय करता मावशीले
कसे मी डावलसू
माय मावशी दोन्हीसनी
पालखी मी उचलसू
बहिष्कार करणारा
मावशीले इसरतस
अहिरानीना पुळका से
सगळा जग ले सांगतस
डाँक्टर इंजिनिअर
मावशीनी कये
मावशीसाठी कायीज
हायी मन्ह बये
माय आणि मावशीले
एक आपण करुत
दोन्हीसले मिळयी मान
आसे काही करुत
मी अहिरानी मी मराठी
वाद नकोच व्हवाले
माय मावशी दोन्हीसना
पाय पाहिजे धोवाले
कवी यश सोनार ठेंगोडा
मो 8856835211