देख गया दाटी उना
जुना सालना चालना
आरे आखरी महिना
नवा सालम्हा जरासा
तुन्हा देखसू आईना॥धृ॥
कसा निरोप देऊ रे
तुले आखरी महिना
पाच दिननाच आत्ये
तुबी आम्हना पाव्हना॥१॥
तुले निरोप देवाले
लिखू कितला मी गाना
बारा महिना तू बी रे
मन्हा संगे चाली उना॥२॥
सुखम्हाबी दुखम्हाबी
व्हता आधार आम्हना
दिन देखाडात तुबी
कधी आम्हले हासाना॥३॥
कधी उनात बी दिन
तुन्हा वरबी रुसाना
दिन ह्या बी रे जाथिन
मन्हा सांगेत रे गाना॥४॥
बारा महिना म्हनात
मीबी तुन्हा संगे गाना
एक दिन बी नही रे
करा कट्टाया लिखाना॥५॥
कशी लिखू मंग सांग
गाना तुले इसराना
कसा निरोप देऊ रे
तुले आखरी महिना॥६॥
आसा कोनता आम्हना
तूशे नाताना गोताना
तुले निरोप देवाले
देख गया दाटी उना॥७॥
निसर्गसखी सौ.मंगला मधुकर रोकडे.
शब्दसृष्टी, प्लाॅट नं.७अ, नारायणनगर, धरणगांव चौफुलीरोड, एरंडोल जि.जळगांव.
दूरध्वनी क्रमांक:-९३७१९०२३०३.