नवराले दारुनं येसन

नवराले दारुनं येसन

चांगला सुखना दिन व्हतात. पन नवराले दारुनं येसन लागी जास. मंग ती बायको कालपात करी त्याले काय सांगस ते या कवितामजार मांडेल शे

वनू व्हतू तुन्हा घरम्हा बनीसन मी रानी
सपन व्हतं मोठं वाटे दाशी भरी पानी
घरम्हा व्हतं सुख दाबी नव्हतं डोळा पानी
पिरेम व्हतं दोन्हीसन अन बोलूत गोड वानी

दिट लागनी संसारले नशीब गय फुटी
भरपुरा संसार दारू ल्हयी गयी लुटी
दारूपाये व्हयी गयी आपली बरबादी
इनंती शे नको लागू दारुना या नादी

पोऱ्या ऱ्हातस भुक्या आपला घरम्हा नही दाना
कोयडी भाकर खावाले त्या म्हनतस नानानाना
आते तरी कारभारी लवकर व्हय तु शाना
नशानी हायी धुंदीम्हातीन जल्दी वापस ये ना

नजर लागनी संसारले कोन्ही कयी करनी
सोड रे दारू मन्हाकरता मी रानी तुन्हा घरनी
वनू व्हतू तुन्हा घरम्हा बनीसन मी रानी
सपन व्हतं मोठं वाटे दाशी भरी पानी

अजय बिरारी