ऊसना मया

ऊसना मया

ऊसना मया

आयबाना मयाम्हान
शेत झाडे भारी न्यारा
माय भूई देस मया
त्यास्ले पोटम्हान थारा.

तिठे बोलस व पिक
जशा आयबा सांगस
फड ऊसना व उभा
जागे जागल्या सोभस

वारासंगे डोले ऊस
पान्ट वाजे फडफड
ताशा वाजस व जशा
टायी वाजे कडकड

काया निया रंग त्यान्हा
दिसे जशा पांडूरंग
भरे गोडवा भलता
पेरा पेरा व्हये दंग

देस दोन्ही हातेवरी
हायी साखरन झाड
पुरे समदा गावले
भरे बोलीम्हान गोड

कायी माटीम्हान पिके
दुजाभाव ना धरस
पंढरीना तो इठ्ठल
जागोजाग बारा देस.

इठूबाना गत भरे
सरा पेराम्हा गोडवा
त्यान्हा जोडे बठीसन
पांडूरंग नाव घेवा.

अशा ऊसना व फड
पोट आम्हन भरस
सरी कडे जशा माले
मन्हा इठोबा दिसस.

काशीकन्या
सबदेस्ना पसारा
काव्य संग्रह