आभिष्टचिंतन

आभिष्टचिंतन

तू मन्ह आभाळ पिरेमनं
मी फक्त झुळझुळता झरा
तुन्ही मयानी धारमा दोस्त
चिंब भिजनू रे मी ! पुरा..॥

तू हिदयना ग्यान समिंदर
मी तुन्हा तळातला सोबती
तुन्ही मैतरीना शिंपलामा
मी व्हयनू रे शब्दमोती !..॥

तू पाठीराखा सखा किसना
मन्हा जीवन रथना सारथी
तू आधारना हात या पार्थना
जरी व्हसू नाना मी महारथी..॥

वाढदिने काय देऊ यार तुले
स्वीकार मन्ही हायी काव्यभेट
तू साहित्यना कैलासपर्बत
देवा एक धाकलसं शब्दबेट..॥

हिदयप्रिय,मन्हा
सच्चा मित्र,बंधुराज कवीवर्य श्री.
कैलास नाना भामरे तुम्हले
वाढदिवसन्या आभाळभर
शुभेच्छा..!

कवी-देवदत्त बोरसे
             (सुगंधानुज)
नामपूर ता.बागलाण जि.नाशिक.
मो.नं.९४२१५०१६९५.