येय वेळ अहिराणीत कवीता
राम राम जी
येय (वेळ )
येय जव्हय घोर घाली
तव्हयं कोना जोर चाली
भाडानं से घर आपलं
मालक म्हनी कर खाली
तुन्हा मन्हा या हिरदनी
मोठी आते खोय करुत
नवा घरम्हा जावानी
चाल आते सोय करुत
सटीना लिखा कधीना चुका
याले कसाले भ्यावुत
दिन मावयताना सूर्य
करस आपले श्यावुत
तुनी सिरिमंती मन्ही गरिबी
गये बिलगी बिलगी रडथीन
दोन्ही सईबहिनी एकच ठिकाने
राख व्हईसन पडथीन
शेवट राम नाम सत्य से
हायी कान उघाडी आयकीले
मोह मायानी हायी दुनिया
हिनं खरं रूप तू वयखी ले
✍️© मोहन पाटील कवळीथकर