लगीन- अहिराणी कईता
मन्हं कईताना संगे व्हयेल शे लगीन
मन्हा लगीनले कितला वरीस व्हयी ग्यात
ते मातर सोदानं नही भावड्यास्वोन
कारण ती आज भी
तरणीताठी जवान शे
हाई गोठ मातर सव टक्का खरी शे
ती मन्हा डोकामां घुसस
आन् माले कागद पेन ली सन
लिव्हाले सांगस
मी पण तिन्हं ऐकंस
ऐकाव नई ते कसं बरं चाली
कागद पेन ली सन
डोकं खाजाडी खाजाडी
कईता लिखंस
कारण भावड्यास्वन
तिन्हा संगे मी लगीन करेल शे
मी वयथीन म्हातारा व्हयनुं
तरीबी इचारथीन जवान शे
संमेलनेस्मा जास बाले काया करीसन
लगीननाच कुर्ता पाजामा
वरनं जाकीट बदलीसन
मना कवी मित्र माले म्हणतंस
आठे काय लगीन शे का
मंग मी बी त्यास्ले सांगस,
मी तरूणच दिखाले जोयजे
अशी मन्ह्या कईतानी अट शे
त्याना करताज
हाऊ कपडास्ना जुगाड शे
कारण……
मन्ह कईताना संगे
व्हयेल शे ल..गी..न….
कवी:-
चंद्रशेखर प्रभाकर कासार
चांदवडकर ,धुळे.