बाकी समदं खुशाल सतं khandeshi bhilau language kavita

बाकी समदं खुशाल सतं khandeshi bhilau language kavita

बाकी समदं खुशाल सतं

माय तुन्ही उनमं करं झायावाया
तरीबी दोन सांजना बसन्हा टाया
पोटना चित्तारामं पाटपोट एक व्हयी जायेल सं
कालदीन नागरनी मांग चालतांना
कुस्सा लागी गया पायला
अंगठाला दोन टाका पडनात
डॉक्टरनी उधारी तशीच बाकी सं
कटी ऱ्हयनात दिन भुक्या तिशा
तू कायबी नको करू चिंता
बाकी समदं खुशाल सतं..

बहीण तुन्ही व्हयी गयी उपवर
लगीन तीन्हा कराना जीवला घोर सं
कर्जमं पडेल सं गहाण वावर
लबाड सावकारना तेन्हावर डोया सं
रोज दारवर यीसन तो देय नाना तऱ्हा न्या गाया
कायीज मं तव्हय बसत बाण..,
लोकस्ना काय ते तं हासीतस
त्यास्ना तोंडवर कोण ढाकण लावणार सं
जगी ऱ्हयनत अपमान ना घोट गियत
तू कायबी नको करू चिंता
बाकी समदं खुशाल सतं

लोकं म्हणत..
पोऱ्याला लिखा णा शिकाळणा
मोठा सायेब करना
सहेरम्ह तेन्हं मोठा बंगला बांधना
बंगलावर नाव राजाराणी कोरेल सं
मंग धयडा मायबापला खेडामं
ठेवाना काय कामं सं ?
तेस्ला काय माहीत दादा

महागाई ना जमानासं वरथीन वहू नाजूक सं
कशी सोशी ती आम्हना दोन भाकरीस्ना भार
पैल्हंगच तुन्हा सासू सासराला तुन्हा साला
तुन्ही घर सोडी जायेल सं
तु सुखमं ठेव त्येस्ला ए.सी. नी खोलीमं
आम्हना काय मुडेल मावठीना

पत्राना घरमं बी आम्हना भागी जाणार सं
तू खुशाल पाटर्या कर तुन्ही बायको आनं
सालीना जलमदिन न्या..सतं
कायजी करू नको आम्हनी
आठे आमना आसू पुसाला गावालं सतं
तू सुखा कर सवसार
बाकी समंदा खुशाल सत

जयराम मोरे सोनगीर
७७०९५६५९५७