Bhilau language kavita
खान्देशी भिलाऊ बोली कवीता
कपायभर
मयवट भरीसन,
माय वडला फेऱ्या मारी ऱ्हयनील;
वडपुनीना सणला,बापनी लंबी उमरना
नवस देवला नवशी
ऱ्हयनील.
बाप,
रगतना पाणी करी ऱ्हयनाल
माटीन्या शिकोरीस्मं आम्हला चांदण्यास्ना,
भात शिजाडी खातांना देखीसन ;
भाकर ना चंद्र घडायी ऱ्हयनाल
कायी अंधारी रात मं
करमगतीना फेरा
डाखा पडना नदारीना सवसार मं
वडपुनीलाज बापना करार पुरा व्हयना
चित्रगुप्त ना पुस्तक मं
भोयी भायी मन्ही सावित्री
मगन आशिल देव नाम मं
गिऱ्हरन लटकी गयाल तव्हयज
तिन्हा कपायना चांदमं.
जयराम मोरे सोनगीर