Ahirani Lyrics अहिरानी गीत

Ahirani Lyrics अहिरानी गीत

अहिरानी गीत

भास्कर

जीव तोडी तोडी सांगे मास्तर
चाल शायम्हा चाल रे भास्कर ||ध्रु||

नको ऱ्हायजो तू बठी घर
चालना जातीन मवरे पोरं
चाल पाठले टांग तू दप्तर ||१||

लागू नको देवू शायनं दुक
करू नको हाई घोड चूक
नै ते हाकलशी भाऊ टॅक्टर ||२||

शिकशन शेनारे वाघीन दूध
मानूस पेताच करस गुरगुर
सांगी ग्यात साहेब बॅरिस्टर ||३||

मायबाप शेतस गरीब तुन्हा
कर इचार त्यास्नी नदारीना
शिकी लिखी बन तू डाक्टर ||४||

पुस्तक वाचानी लाव गोडी
नाद मोबाईलना देना सोडी
काब जागस येडा तू रातभर ||५||

खरं सांगस भाऊ इजू नाना
तेन्ही तयमयले तुम्ही जाना
जिंदगी बनाडा पोरे हो सुंदर ||६||

जीव तोडी तोडी सांगे मास्तर
चाल शायम्हा चाल रे भास्कर


विजय निकम धामणगाव,
चाळीसगाव
मो.नं. ८८८८९४५३३५