khandeshi akhaji
Khandeshi Akhaji आखाजी
‘आखाजी ना सन हिरा मोती न धन’
लेखन:-संजय धनगव्हाळ
(अर्थात कुसुमाई)
भाषा:-अहिराणी
***************************
“आखाजी ना सन हिरा मोती न धन”
सडा रांगोई टाकीसन सजाडा आंगन
खरं शे सन कोनता का ऱ्हायेना, सन हिरा मोती न धन ऱ्हास.सन म्हणजे भारतीय संस्कृतीनी एक देन शे.हायी संस्कृतीनी देन पिढी दर पिढी चालू शे.त्या संस्कृतीना संस्कार शेतस म्हनिसन या सनेस्नं परंपरागत जतन आज करी ऱ्हायनूत.सन म्हणजे आपला संस्कृतीनी वळख ऱ्हास. त्यामुळे आपला भारतीय संस्कृतीमा सनेस्ले खूप महत्त्व शे देवदेवता पासिन साधुसंत पावत ते आजतागायत सन उत्सव रिवाजनी परंपरा अखंड चाली ऱ्हायनी.परतेक भारतीय नागरिक त्यास्ना त्यास्ना परंपराखाल आप आपला गावम्हा शहेरम्हा सन उत्सव साजरा करतस्. म्हनिसन आपला खान्देशमा भी आखाजीना सनले खूप महत्त्व शे. परंपरागत आपला वाडवडिलपाहीन हायी प्रथा चाली ऱ्हायनी.हावू परतेक खान्देशवासीस्ना मानपान्ना सन शे या सनले आपला खान्देशम्हा जास्तीकरीसन ग्रामीण भागाम्हा वज्जी महत्त्व ऱ्हास.या दिन कोन कोठे का ऱ्हायेना त्याले आखाजी साजरी कराले आपला गावले येनच पडस्. आखाजी म्हणजे खान्देशनी मातीनं वैभव शे या वैभवना मान राखाले दुरदुरथी लोके आपला गावांनी मातीले पाय लावावे येतस.म्हनिसन म्हनतस ,
आखाजी ना सन हिरा मोती नं धन
आखाजीले ,अक्षयतृतीया भी म्हनतस शिवाय अहिराणी संस्कृतीमा अखाजी हाऊ नवीन वरीस व अहिराणी गौरव दिवस म्हनिसन भी साजरा करतस साडेतीन मुहूर्तांपैकी आखाजीना सन एक शुभ दिवस ऱ्हास. या दिन नवीन कामे करतस भुमिपुजन करतथीन,नवीन गाडी लिथीन,सोनं खरेदी करथीन.आखाजी सन एक लोकसस्कृतीनी परंपरा शे हायी लोकसंस्कृतीनी परंपरा घरेदारे ग्रामीण भागाम्हा मानपानथीन साजरा कराना रिवाज शे.या दिन पित्रेस्न स्मरन करीसन त्यास्ना नावनी आगारी टाकीसन त्यास्ले जेवाले बलावतस. आखाजी म्हंजे आपला वाडवडिलेस्ले आखाजीना दिन बलाईसन त्यास्ना नावं न डेरग म्हंजे अक्षय्यघट भरतस.हायी डेरग भरानी प्रथा खान्देशमा घरेघर ऱ्हास.नवीन घागर लैसन तिले पुजतस सकाळ जल्दी उठीस दारनं वट्न्न म्हंजे उंबरठा पुसीपासीसन हायद कुंकू लायसन त्यानी पुजा करतस.नमस्कार घालीसन पित्रेस्ले निवत देतस् जसे काई बाराना टाईमले चुल्हामा घास टाकतस.पुरनपोई आमरसन.निवद दावतस.खान्देशम्हा आनखी एक लौकीकार्थी परंपरा म्हंजे आखाजी हावू सासुरवाशीणना भी सन ऱ्हास. सासर जायेल सुनाबेटीस्ले आखाजीना रोज माहेर यवानी ओढ लागस. म्हनिसन
सासरनी गौराई माहेरले वनी
औक्षण किरिसन टाकूत दिले ववाळनी
ती जसी कायी कळलाईसन आखाजीनी वाट दखस.या निमीत्ताखाल मायबाप भाऊबहिनीस्ले मैत्रीनीस्ले भेटाले मिळस आखाजी उनी म्हंजे बठ्ठास्ले हिरीक भराईजास. त्यानाम्हा सासरवासीनले माहेर जावानी भलतीच घाई व्हयेल ऱ्हास कवळ निरोप येई आनी कवळ दवडसु माहेरले.मायना भी जीव आंडेरले भेटाकरता काल्यावाल्या करस
आखाजी ना सन उना
दौडी दौडी जाय भाऊ
आंडेर उनी माहेरले ते
तिले अमरसना पाव्हंचार देऊ
आंडेर येत नै तव लागुन माय ते चिमणीना गत येरझाऱ्या मारस आंगलदार मांगलदा.माये ते मायच ऱ्हास पोरले दखा करता जीव तिला तुयतुय करस. जशी आंडेर मायना घर पाय ठेवत नै तसेच येताच बरोबर मायना जिवडा आमायीकोमायीस गळाभेट लिसन आंडेरन स्वागत करस.लगीन व्हयेल नवतरणी पोरीस्ले आशाकाई आनंद व्हास जश्या अंबाना फुलोरा टर टर फुलस तशा आंनद व्हस.मग काय गावम्हा येयल बठ्या पोरी एकत्र जमतस आप आपल्या घरन्या गप्पाटप्पा मारीसन मस्त हाशीखुशीथीन.प्रत्येक आठवणी गोयाकरीसन परत त्या धाकलपंनम्हा जातस.जवळ सगळा मित्र मैत्रिणी एकत्र जमतस ना तो माहोल तवळना प्रसंग खरच जतनकरा सारखा ऱ्हास.
ज्या दिन ग्यात त्या सोनाना ऱ्हातस
हाशीखुशीनी शिदोरी भांदीसन संगे लै जातस
गया दिन त्या परत येतस नै
पन आठवन करावाचुन ऱ्हातस नै म्हनिसन
एक दिन्नी जिन्दगी मनसोक्त जगी लेवानी
सनेसुदेस्नी धामधुम करी लेवानी
या सनेसुदेस्ना धामधुमनी करताच आंडरी आखाजीले माहेर यतस् एकत्र जमतीस आमराईमा जायीसन गौराई पुजतीस आंबाना फांदीलो दोर भांदीसन मस्त झोखा खेळतीस गाणा म्हणतीस.या पोरीस्ना खेळ देखीसन झाडावर बठेल मैना भी गाणं म्हणाले लागी जास.आख्खा दिवस आमराईमा जास संध्याकायले मंग संमद्या गौराई लैसन जागरण करतस.सासुरवाशीन आंडेरले रस पुरणपोळी जेवण करीसन चार पाच रोज ऱ्हायसन मंग राजीखूशीथीन वाट लावस
रडू नको मनी मैना तू खुशी खुशी ऱ्हाय
याद उनी तुले ते तू दौडी दौडी येत जाय
अंबाना वनम्हा झोका खेळतीस चार रोज माहेरले ऱ्हायीसन नवराना घर जावानी येळ येस तवळ माय मावली आपला लाडकी आंडेरले वडा पापड कुरडया शेवया आशा सारसामान बांधीसन तिले तिना घर रवाना करस.आंडेर जास ते मायना उर दाटीयस आंडेरले निरोप देवांना टाईमले आंडेर म्हनस
माय मी मना घर चालनू
तू तुनाकडे ध्यान ठेवजो
दिवायीले लेवाले माले
भाऊ जल्दी धाडजो
आखाजी म्हंजे नुस्ता सन नहीं ती अहिराणीन संस्कृतीनी सांस्कृतिक परंपरा शे म्हनिसन आखाजीना सन तन मन धनथीन श्रध्दाथीन साजरा करतस.या आखाजी ना सननी पुजा कराले त्याना जागर कराले लोके मनम्हा उत्साह लैसन आपला गाव येतस.आख्खा परिवार मिळीसन अन्नधान्यनी पुजा करथीन शेतीना अवजारेस्नी पुजा करथीन यान कारण आसे की वाडविडीलस्ना, पित्रेस्ना आशिर्वाद,घरम्हातल सुख, शांती,समाधान,आनंद,समृद्धी,आरोग्य, ऐश्वर्य,धन,धान्य,काहीच सराले नको कायम अक्षय ऱ्हावाले जोयजे या करता अक्षयतृतीया म्हणजेच आखाजी ना सन साजरा करतस.त्या करता वरीसमा एक रोज येणारा हावू सन साजरा कराले शहेरमा जायेल गावकढला बठ्ठा पोरेसोरे लेकरे नाते सुनबेटी आपला गावले यवानी घाई करतस.आंडेरले माहेरनी ओढ लागस.काहीका म्हना पण गावते गावचं ऱ्हास
गावांनी ओढ जशी अंबानी फोड
आपुलकी ना बोल लागतस गोड
गाव गये म्हणजे सगळा जीवलग मित्र भाऊबंद भेटतस मग काय चैत्र न उन तपेलऱ्हास खळामा मळाम्हा वावरम्हा नदिना पेरवर मारोती ना पारवर वड ना झाड खाले तासंतास बठान जिवशीवन्या गप्पा करान्या येरायेरना घर जाईसन भेट देवानी,बैल गाडी हाकलानी मस्त हाऊस फेडी लेवांनी. शेतीमातीनी हिरवाई डोयान पारन फेडस.हायी सारी नवलायीनी गोट दखीसन मन प्रसन्न व्हैजास.त्याज बरोबर आपला पोरेसोरेस्ले गावनी लोकसंस्कृती दखाडानी.गाव म्हणजे एक कुटुंब ऱ्हास म्हनिसन काहीही झाये तरी गावांनी ओढ स्वस्थ बसू देत नै सन उना म्हणजे पाय आपसूकच गावांना वाटे दौडाले करतस.
कोनी कितलाक्का जायेतना दुर देश
गावानी मातीना सुगंध गावांनी याद करी देस
कसं शे की वरीसभर गावम्हा काहीच ऱ्हास नै पण दिवायी दसरा आखाजीना दिन घर भरी जास आपला माणसे घर येतस तवळ खराखातीर घरम्हा घरपण दिखस.
सुन सुन गाव मन
एक रोज म्हा गजबजी गये
रिकामा घरम्हा जसे काइ
आंनद खळखळ व्हाये
खरं शे ना गावशीव सोडीसन जायेल आपला घरना मानसे सनवारे गाव येतस ते घर कसे भरीजास चारपाच दिन ते घरम्हा नुस्ती कलकलाट ऱ्हास हासी खुशी गंमती जमती गप्पा टप्पा कराले दिन पुरत नै रात कमी पडस. म्हनिसन आपला साधुसंतस्नी जी सनेस्नी परंपरा लायी देलसे ती परंपरा माणसेस्ले या निमित्तखाल एकत्र लैयेवान काम करतस.प्रत्येक सनेस्न काहीना काही महत्व शे म्हनिसन आपली लोकसंस्कृतीना सन्मान करालेच जोयजे.जवळ परत जावानी येळ येस तवळ गाव सोडानी ईच्छा व्हस नै कारन वरीसम्हा एकदाव नै ते काही ना काही निमेत्तेखाल येन व्हस त्यामुळे मन रमी जास.आपला गावले येवाले टाईम लागस पण परत जावाले टाईम लागत नै. याकरता
येतजात ऱ्हायन की गाव सुटस नै
प्रेमना झरा जरा भी आटस नै
पण गाव उन म्हंजे परत जानस पडस इच्छा नै ऱ्हास तरी पण.म्हणतसना
दिवाळी दसरा आखाजीले
ओढ लागस गावनी
दार बाहेर काढेल चप्पल म्हणे
दोन रोजी पाव्हनी
अशी माणूसनी अवस्था व्हैजास काय.
जय कान्हदेश जय अहिराणी
संजय धनगव्हाळ
(अर्थात कुसुमाई)
९४२२८९२६१८
९५७९११३५४७
खान्देशी सण आखाजी जागतिक अहिरानी लोकवाड.मय दिवस