Khandeshi Akhaji आखाजीन्या सर्वास्ले हार्दिक शुभेच्छा

Khandeshi Akhaji आखाजीन्या सर्वास्ले हार्दिक शुभेच्छा

निवत-बोनं

         वैशाख महिनानं उन बाहेर मनमन तितलं आगीन वकी र्हायंथ..तरीबी माय-माहेरले आखाजीले येयेल पोरी आंबा-लिंबना झाडस्ले बांधेल झोकास्वर हाशीखुशी..आथानी कैरी,तथानी कैरी,कैरी झोका खाय वं..आश्या एकथुन एक गाना म्हनीस्नी आखाजीना सननी तयारी दनकायीस्नी करी र्हायंथ्यात..

त्या गाना आयकीस्नी भागरथा मायना डोया तिन्ह्या आंडरी सुगंधा,इंदु अनी पमानी यादमा गच्च भरी उनात..परपंच अनी वाढता लेकरस्ना व्यापमुये यंदानी आखाजीले काय त्या उन्यात नही..घरमा आठराईस्व दारीद्रय..

ऊसना पांदडाना साधा-भादा झोपडामा नजरमा अधु व्हयेल नवरा दौला आप्पा अनी लवसव आंडोर देवाले पखामा घाली गरीबीना धोंडा भरेल सवसारनं गाडं व्हडी र्हायंथी..डाबरीना आठ्ठावीस गुंठा वावरमाबी यंदा जेमतेम तीनचं पोता गहु येयेल व्हतात..दोन पोता ईकीसन मजुरीना पैसा,दुकानदारस्नी उधारी,काही हातउसना लेयेल पैसा याजसहित ज्याना त्याना आंगे लायी मिटाडी दिनथात..

आखाजीना सनना रोज आंगन वट्टा झाडीस्नी सयंपाकनी तयारी भागरथा मायनी करी..तवलोंग दौला आप्पानी नथा कुम्हारकडथुन इकत आनेल माटीन्या घागरीस्वर आंबा,टरबुज अनी आंबाना पाने मांडी ठेवात..भागरथा मायनी मंग उंबरटले चंदन लायीसन थोडासा कुकू-हायद लाकुडना पस्पायाम्हायीन काढीस्नी दार लिन्ह अनी वट्टावरथुनच देवाले आरायी दिन्ही..


“देवा..ये देवा..कथा शिलगनारे तू ?
चंदू,संजू अनी जगूनी संगतमा देवा गोट्या खी र्हायंथा..
मायना गराम पंचायतना भोंगाथीनबी गयरा मोठा आवाज येताचं देवा हातम्हान्या गोट्या तठेच टाकी वारानागत सुसाट धावत घर उना..मायना पदरले घामटायेल तोंड पुसता-पुसता त्यानी ईचारं,”काय वं माडी..काबर बलावं वं ?

अहिराणी भाषा आखाजी कविता
अहिराणी भाषा आखाजी कविता


तानका न्हायीनी कटींगना मिशीनघायी खयडी देयेल डोकावरना पसात केशेस्वर हात फिरायस्नी भागरथा माय त्याले बोलनी,”व्हय मन्हा दादा..हायी येवढं निवत-बोनं राममंदीर,मारुतीनं देऊय अनी नदीजोगला ईर अनी मावल्यास्ना ठानास्वर थोडं-थोडं चढायी ये..


आप्पाना जुना धोतरना पानम्हायीन फाडेल फडकीमा बांधेल ताट एक हातमा धरीस्नी अनी दुसरा हातमा ताबांना पानी भरेल तांब्या लिसन देवा बिगर वावन्यास्ना रस्तावर चाली र्हायंथा..पायले चटकाते गन्ज बशेत..पन ज्याले गरीबीना चटका सहिन करानी सवय पडेल व्हती त्यान्हापुढे या रस्ताना चटका ते भयान गरीब व्हतात..वाटवर पोट भुकेभुके रिकामं व्हयेल व्हतं म्हनीस्नी देवानी ताट-तांब्या खाले ठीसन कंबरनी ढिल्ली व्हयेल खाकी चड्डी वर वढी लिन्ही..तिन्हावर काया करदोडा चढायीस्नी काटकीघायी चड्डी फिट करी लिन्ही..अनी तो ऱस्ताले लागना..


नदीजोगेना देऊयेस्पान देवा उना ते तठे भली मोठी आगगाडीना डबास्नामायक लोकेस्नी रांग लागेल दिसनी..जो-तो निवत-बोनं चढायीस्नी,नारय फोडीस्नी,वयखना लोकस्ले परसाद वाटीस्नी घरेघर जायी र्हायंथा..रांगमा उभा देवानं आचानक पिप्पयजवय बशेल भिकारीकडे ध्यान गय..तो भुक्या जीव किलावन्या करीस्नी खावाले मांगी र्हायंथा पन कोनी त्याले ढुकी दखे नही..देवानी घडीभर ईचार करा..

देऊयम्हाना देवनापुढे खावाना ढीग लागेल शे पन तो काही खात नही..मीबी त्यान्हापुढे खावाले ठेवं ते तो काहीच खावावं नही..यीनमीन बारा वरीस वयना देवा..त्यानी सरय रांग सोडी दिन्ही.. अनी तो पिप्पयजोगे बशेल त्या भुक्या धल्ला भिकारीसमोर बठना..निवतनं ताट तठे त्यान्ही मोकयं कयं..त्या धल्लाना हातमा पुरनपोयी दिन्ही अनी वाटीमा भरेल आंबाना रसबरोबर खावाना त्याले आग्रोह करा..वश्याया व्हयीस्नी तो धल्ला इबाक-तिबाक दखी र्हायंथा..त्याले भ्याव वाटे कोनी बोली नही ते मारीते नही बठावं ना..

रांगमा उभा लोके कोनी हाशी र्हायंथात ते कोनी निस्ता पट्यारानामायक दखी र्हायंथात..रांगम्हानच एक जन बोलनं,
“कोन्ह शे रे ! हायी येडपट फिंदरं?”
दुसरा लगेचं बोलना,”घोड्या माळनी वस्तीम्हानचं वाटी र्हायनं भो “तिसरा लगेचं देवाना मनले जिव्हायी लागी आशा बोलनां,


“नालाइकले रांगमा उभं र्हावानं दुःख लागनं व्हयी..म्हनीन त्या भुकाटेलले खावाडी मोकया व्हयी र्हायना..”एक बाई कर्हायी लायीस्नी बोलनी,”या आजकालना बांगटस्ले देवधरमना रितीभातीबी कयतस नही वं माय..” बठ्ठा आग्यामव्हायसारखा  टोचनारा सब्द देवा निगरगट्ट बनीस्नी आयकी र्हायंथा..

धल्ल्याले पोटभर जेवाडीस्नी जव्हय देवानी तांब्याम्हानं पानी पेवाले दिन्ह तव्हय त्या भुक्या धल्लाना डोयाम्हाथुन झिरानामायक पानी भरी वाही र्हायंथ..रिकामं ताट देवा फडकामा बांधीनी परत घर जास नही..तवलगुन भुत भवरीनागत हायी बातमी भागरथा मायना कानपर्यंत आदडायी गयी,कोनीतरी मायले सांग,”भागामाय तुन्हा येडा देवानी देऊयमा निवतं न दखाडता रस्तामाच कोनलेतरी खावाडी दिन्ह.

“शेजारनी आहिलाबोय भागरथामायले बोलनी,”माय तुन्हा पोऱ्याना डोकामा फरक पडी जायेल शे..एकते त्याले चांगला डाक्टरकडे दखाड नहीते झिपा भगतकडे त्यान्ही पटोयी तरी दखाड..

शेजारपाजारन्या बायास्नं हायी पोथीपुरान भागरथामाय उगमुगं आयकी र्हायंथी..तिन्ह हिरद ज्वालामुखीसारखं तपी जायेल व्हतं..तवढामा देवा समोरथुन उना..कोपरामाच पडेल बैलगाडाना दुशेरनी सवयी लिसन दारमा पाय टाकताच देवाले तिन्ही खवयीस्नी ईचारं,

” का रे ! तुले मरी माय खायजो कोल्हाट्या..मी तुले सांग काय अनी तू शीनचाया करी उना काय रे ? देवा काही सांगाना आगोदरचं भागरथा मायनी त्याले सवयीघायी निया-पिवया व्हस तवलोंग शेमटाडी काढं..देवा जीवनी कायपात करीस्नी सांगी र्हायंथा,”माडी नको मारु वं ! मन्ह जराख आयकी ते ले..पन भागामाय काहीचं आयकानी स्थितीमा नही व्हती..


अनी संतापमा शेवट कोपरामा सवयी फेकी दिन्ही..तेवढामा दौला आप्पा ढोरे-ढाकरेस्ले चारा टाकीस्नी घरमा उना..रडी-रडी थकी जायेल देवा फुसकी र्हायंथा..आप्पानी त म्हनता तपेलं समजी लिन्ह अनी देवाले सांग,”कसाले सनेसरादे बिगरवायकारना उदयोग करस रे येडा ?

चाल तोंड धोय अनी दोन घास खायी ले..पन फुगेल देवा तनंफनं करीस्नी देवघरनी खोलीमा झावर टाकी आडा पडना..तठेन त्यान्ही आयकं माय आप्पाले सांगी र्हायंथी, “नका रावन्या करु त्या दैतन्या,तुम्हीचं माताडी ठेवा त्याले लाडकायीसन..दखस ना मीबी कितला भुक्या र्हास ते..? दौला आप्पा आगारी टाकी जेवन व्हताचं खयामा निंघी गया.

भागरथामाय ताट करीस्नी जेवाले ते बसनी पन घास तिन्हा नरडामा टाकानी इच्छा व्हये नही..भरेल ताट तिन्ही तश्याचं झाकी दिन्हा.. दखता-दखता तिसरा पहार व्हयी गया..सकायपायीन मार खायीस्नी पडेल भुक्या लेकरूना ईचार करताच ती माय-माऊलीनं हिरदमा गलबली उनं..

देवघरनी खोलीमा रडी-रडी देवा झोपी जायेल व्हता..टपटप गयेल आसुस्ना वगाया गालवर पडेल व्हतात..पायन्या पोटऱ्यास्वर पडेल सवयीना कायाजरख वय दखी तिन्हा हिरदले पीय पडी र्हायंथात..भागामायना डोयास्मा ममतानं आभाय दाटी उनं.

गप्पकन ती तठेचं बठनी..देवाना कधी गालवर ते कधी पोटऱ्यास्वर मायेमाये हात फिरायी र्हायंथी..अर्धा जागा व्हयीसन देवानी जव्हय तिन्हा हात झटकी दिन्हा तव्हय भागामायना डोयामा घयघय आसू तरयीस्नी हुंदका दाटी उनथात..आसूस्ना थेंब देवाना गालवर पडताच तो ताडकन उठना..मायना भरेल डोया अनी रडु दखीसन तो चिनभिन व्हयी गया.

माय रडता-रडता सांगी र्हायंथी,”मन्हा सोन्या,मन्हाशी बोल ना राज्या..नको रागे भरु रे ! मी तुले भलतं मारं ना ! म्हनीनं देवबा माले रडायी र्हायना..मायना हिरदले भिडनारा सबदं आयकीस्नी देवा तिन्हा गयाले बिलगी पडना..अनी बोलना,”माडी नको ना वं रडु.

माले कशीचं वाटस..मी तुन्ही शफ्फत लीसन सांगस माडी..मी रस्तावर कोनलेचं नही खावाडं..देऊयपन तो भुक्या धल्ला बाबालेच फक्त जेवाडं..लोकेस्पान तो खावाले मांगी र्हायंथा पन लोके तो देऊयम्हाना न खानारा दगोडना देवपुढे वाढेत..बाहेर कुतल्लास्लेबी खावाडेत पन त्याले बिचाराले कोन्ही काहीच देये नही.

तो माले जेवानंतर काय बोलना माहित शे माडी ? तो बोलना देव तुले अनी तुन्ही आनपुरना मायले आंबरना पाटा देवो..सुखनी हायाती देवो..देवाना या कवतिकना बोल आयकी भागरथा मायनी त्याले पाठगोयी उचली त्याले मोरीमा बसाडं..हातपाय,तोंड धोयीस्नी त्याले लुगडाना पदरघायी पुसं..मांडीवर बसाडीनी त्यान्हा मुकु लिन्हा..ताटमा

आंबारस,पुरनपोयी,भज्या, कुल्लाया,रशीभात वाढीस्नी हातीघायी घास भरावा..देवानी जव्हय रस-पुरीना घास लीसन भागरथा मायले तोंडमा बलका भरावा तव्हय तिन्हा डोयामा पानी दाटी उनं..कावराबावरा व्हयीसन देवानी तिले ईचारं,”माडी काबरं रडी र्हायनी..मी चुकायनु का? गहिवरीस्नी भागरथा माय बोलनी, ”नही रे !

मन्हा राज्या..चुकायनु ते मीच..आवलगुन जग माले सांगे,” भागामाय,तुन्हा हाऊ देवा येडा शे..पन आत्ते माले कयनं..”खरं ते मन्हा देवा शहाना शे अनी हायी जगचं येडं शे..हायी भागरथाना भागे येयेल तु पोऱ्या नही रे !..तू ते मन्हा पोटे येयेल देवचं शे रे ! खरं निवत-बोनं कोनले चढावो हायी जगले शिकाडनारा अनी दखाडनारा..!

सुगंधानुज Khandeshi Akhaji
नामपूर ता.बागलान जि.नाशिक.
मो.नं.९४२१५०१६९५.

Khandeshi Akhaji

गवराई उनी आखाजीलें

आखाजीलें

Ahirani language Akhaji poetry

गवराई ना सनले