Khandeshi Ahirani Poem कज्या
गल्लीमा रोज
व्हयेत कज्या
कज्या पाव्हानी
भलती मजा….
याळ ऊगना
सुरू कज्या
याळ बुडना
सुरू कज्या….
म्हतारानी
म्हतारीसंगे कज्या
माळकरीनी
दारुड्यासंगे कज्या….
रातले नवरा
मांगे भज्या
बायको संगे
करे कज्या…
कज्या ना पायरे
गल्लीले सजा
लोकसले मात्र
फुगट नी मज्या….
नही व्हतीत
आते कज्या
मोबाईलवर बिझी
राणी राजा….
गयात त्या दिन
गयी ती मजा
गल्यामा व्हयेत
रोज कज्या….
विवेक पाटील
मालेगांव (नाशिक)
कज्या