कान्हदेशी सारस्वत एक मुखी बोला आहिराणीना जागरसाठे नेरले चला

7 अखिल भारतीय अहिराणी साहित्य संमेलनं

कान्हदेशी सारस्वत एक मुखी बोला
आहिराणीना जागरसाठे नेरले चला


मंडयी रामराम, कान्हदेशना भूमीम्हा मायबोली आहिराणीना जागर करागुंते आजवर ६ अखिल भारतीय अहिराणी साहित्य संमेलनं पार पडनात. याच परंपराम्हा आते सातवं आहिराणी साहित्य संमेलन २५ फेब्रुवारी २०२४ रोजे धुयं जिल्हाना नेरम्हा व्हयी ऱ्हायनं.

या संमेलननी तयारी जोरम्हा सुरु शे. आयोजक समितीनी या संमेलननं बोधचिन्ह नुकतंच प्रसिद्ध करीसन संमेलननी रीतसर भेर वाजाडी दिन्ही. हाऊ बिगूल बठ्ठा कान्हदेशी आहिर भाऊ-बहिनिस्ले जागे करागुंता शे. अहिराणी बोलीना सम्दा साहित्यिक, कवी, कादंबरीकार, कथाकार, गीतकार, गायक, नाटककार, लोकवाड.मयना अभ्यासक, अहिराणी बोली आणि खान्देशी लोकसंस्कृतीना अभ्यासक, संशोधक, खानदेशी कलाकार या सर्वास्नी मायबोलीना या उच्छावम्हा हाजरी लाईसन आपला परीथून हातभार लावना शे.

एखादं संमेलन लेनं म्हंजे “जगन्नाथना रथ” ऱ्हास. तो व्हडनं एखलादुखलानं काम नही. समदास्नी आपले जमी ती जबाबदारी स्वखुशीतून उचलवो. हाऊ रथ व्हडाले हातभार लावो, हाई मनफाईन रावनाई करंस.

                     संमेलननं बोधचिन्ह बहू देखनं तं शेच पन तेम्हा कान्हदेशना संस्कृतिनं मर्म दडेल शे. येम्हा कान्हदेशी वाद्य, लेखनी, घट्या, आखाजीना झोका, ओवी वाड्मय, साहित्य, कृषी संस्कृतीनं प्रतिक म्हनीसन सर्जाराजानी जोडी, लाकडी गाडं आनी तेन्हावर सवार बळीराजा, ऐतिहासिक किल्लास्ना ठेवा आनी लोकसंस्कृतीना बहुआयामी मिलाफ दखाडेल शे. हायी बोधचिन्ह आहिराणी साहित्य-संस्कृतीना जनू आरसाच शे. आयोजकस्नी कल्पनाले चित्रकारनी आपली कलाम्हाईन चार चांद लायीदेयेल शेतस. या बोधचिन्हाना चित्रकार खरा अर्थाथून आरस्तोलना हकदार शे. बोधचिन्ह आपला कला थाईन बनाडणारा कवी/चित्रकार/साहित्यिक दिनेश चव्हाण सेतस.त्यासले आतेच दादासाहेब फाळके पुरस्कार भेटना.

                    मंडई, आहिराणी संमेलनस्नी परंपरा २५ वरीसनी व्हयी ऱ्हायनी. ती दिनपरदिन समृध्द व्हयी ऱ्हायनी. येना पहिले ६ संमेलनंस्नी यशनी कमान चढतीज शे. पहिलं आहिराणी साहित्य संमेलन मांडळ (तालुका अंमयनेर-जिल्हा जयगाव) ले१२ फेब्रुवारी १९९८ रोजे झायं. संमेलनाध्यक्ष व्हतात प्रा. राजा महाजन. या संमेलननं उद्घाटन करं व्हतं रानकवी ना. धो. महानोर यास्नी. २रं आहिराणी साहित्य संमेलन कासारे( तालुका साक्री जिल्हा धुयं) ले २७-२८ फेब्रुवारी १९९९  रोजे झायं. संमेलनाध्यक्ष व्हतात प्राचार्य सदाशिवराव माळी. ३रं आहिराणी साहित्य संमेलन चाळीसगाव (जिल्हा जयगाव) ले २४-२५ मार्च २०००  रोजे झायं. संमेलनाध्यक्ष व्हतात प्रा. डॉ. रमेश सूर्यवंशी. ४थं अहिराणी साहित्यसंमेलन नाशिकले ३/४ डिसेंबर २०११ रोजे झायं. या संमेलनन्या अध्यक्षा व्हत्यात प्रा. डॉ. शकुंतला चव्हाण. ५वं अहिराणी साहित्य संमेलन धुयाले २२-२३ डिसेंबर २०१२ रोजे झायं. या संमेलनना अध्यक्ष व्हतात सुभाष अहिरे. ६ वं अहिराणी साहित्य संमेलनबी धुयालेच २१/२२ जानेवारी २०२३ रोजे झायं. या संमेलनना अध्यक्ष व्हतात रमेश बोरसे.

या संमेलनस्ना संगसंग खान्देश हितसंग्राम कल्यान मार्फत सुरेशनाना पाटील, पुनानं आहिराणी कस्तुरी मंचन्या विजयाताई मानमोडे, उत्तर महाराष्ट्र खान्देश विकास मंडळना माध्यमथून विश्व आहिराणी संमेलनना डंका वाजाडणार विकास पाटील, खान्देश हितसंग्रामना माध्यमथून नाशिकन्या सुनिताताई पाटील, अर्पण सेवा फाऊंडेशन, वापीना माध्यमथून संग्रामसिंह राणा, आहिर बोली फेसबुक पेजना माध्यमथून गिरडना रमेश धनगर आनी थेट गुजरातना सुरतम्हा जितेंद्र बाहरे यास्नीबी आहिराणी संमेलनस्न्या पालख्या उचलेल शेतीस. या संमेलनस्म्हाभी भलतीज रमुज अनभवामा येयेल शे.

                        पंढरपूरले आषाढी – कार्तिक एकादशीले जश्या गावगावथून संतस्न्या पालख्या येतीस आनी तेस्नी भलीमोठी वारी तयार व्हस, तसंज हाई अखील भारतीय आहिराणी संमेलन शे.

आते ७ वं आहिराणी साहित्य संमेलन २५ फेब्रुवारी २०२४ रोजे नेर (ता. जि. धुयं) ले व्हयी ऱ्हायनं. या संमेलनना अध्यक्ष सेतस डॉ. सुधीर देवरे. संमेलन यशस्वी व्हवासाठे संमेलनना स्वागताध्यक्ष आ. कुणाल पाटील, खान्देश साहित्य संघना कर्ताधर्ता – अध्यक्ष प्रा. डाॅ. सदाशिव सुर्यवंशी आनी पदाधिकारी राबिऱ्हायनात. हाई आपलं घरनं काम समजीसन येम्हा हातभार लावा करता आनी संमेलननं निवतं देवा करता आहिराणी भगत म्हनीसन हाऊ लेखन परपंच शे.

राम राम मंडयी, भेटूत मंग संमेलनना मंडपम्हा.!

© प्रा.बी.एन.चौधरी.


   

7 अखिल भारतीय अहिराणी साहित्य संमेलनं

सातवे अहिराणी साहित्य संमेलन अध्यक्ष ओळख

७ व्या अ.भा.अहिराणी साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हाचे प्रकाशन

कवीसंमेलन 7 वे अखिल भारतीय अहिराणी संमेलन