Khandeshi Ahirani Kavita खान्देसनी से मी नारी
खान्देसनी से मी नारी
मन्हा चव से हातले
जसा फुलसं मोगरा
आसा रांधस भातले॥धृ॥
राई जिरानी फोडनी
देस चुल्हानी कढीले
देखा लागस सवाद
थाटी वाढता घडीले॥१॥
एक डाव खाई देखा
कयनानी भाकरीले
चवं सोदा जबानले
चटकनी चटोरीले॥२॥
मन्हा मिरचीना ठेसा
नही बरं आसा तसा
खाई देखा फिरीसनी
थाटी वर बी यी बसा॥३॥
चुल्हावर रांधस मी
देखा खापरन्या पुर्या
एक एक हातभर
नही पडाऊ आपुर्या॥४॥
पुरनना पानीनी वं
मन्ही सरस रसोई
खायीसनी नवाजी वं
राजा व्हवो का गोसाई॥५॥
देखा वांगानं भरित
संगे कांदानी पातले
काटा वरना वांगानी
काय सांगू व बातले॥६॥
निसर्गसखी सौ. मंगला मधुकर रोकडे अधिक कविता वाचण्यासाठी क्लिक करा
शब्दसृष्टी प्लाॅट नं. ७ अ, नारायण नगर, धरणगांव चौफुली रोड, एरंडोल जि.जळगांव.
दूरध्वनी क्र. :-९३७१९०२३०३.
अहिराणीतून मराठीत अर्थ
खान्देसनी =खान्देशची, से= आहे, चव =रुची, हातले=हाताला, जिरानी=जिर्याची, देस=देते, लागस=लागतो, सवाद= स्वाद, थाटी=ताट, एक डाव=एकवेळा, खाई देखा=खाऊन बघा, कयनानी भाकरीले =कळण्याच्या(ज्वारी+उडीद+मीठ)भाकरीला, जबान= जिभ, चटकनी=चटक लागलेली, ठेसा =ठेचा, खापरन्या पुर्या =मांडे, पडाऊ=पडणार, रसोई =आमटी, नवाजी=नावाजेल, व्हवो=असो, गोसाई=गोसावी (साधू संन्याशी), वांग्याचं भरीत, कांद्याची पात, काट्या कुट्यांवर भाजलेल वांगं,त्याची चव काही औरच असते.
5 thoughts on “Khandeshi Ahirani Kavita खान्देसनी से मी नारी”
Comments are closed.