तुन्हाच तुले आधार Khandeshi Ahirani
तुन्हाच तुले आधार…
जीवनना वाटवर
नही कोनाच आधार
कर संघर्ष जागाले
तुच ये ले व्हय सादर…!!
मतलबी हाई दुनिया
नही कोनीच कोन
तुच तुन्हा आधार ले
मत नको देखू त्यान…!!
नको बोझ कोनावर
मनना राय तु ठाम
आगीनले चिरत सरक
सामोर जाय जीवनमा…!!
नाव पार कर तुन्ही
खडतर प्रवासमा
वार्यानागत चाल पुढे
व्हयक निर्माण कर जगमा….!!
गाठशी तू शिखर
नको हारू रे हिम्मत
चमकाड तुन्हा तारा
तेव्हय कयी तुन्ही किम्मत…!!
चालताले नमस्कार करतस
समजी स्वार्थी जगना सार
भेटी कामयाबी तुले पुढे
दिसथीन रंग न्यार न्यार…!!
तुच तुन्हा शिल्पकार
घडावशी तुच तुले
रंग देशी तौ आयुष्याले
तव्हय अर्थ येई जगाले…!!
Psi विनोद बी.सोनवणे धुळे
दिनांक =१४-१२-२०२४