ईमाम मामू अहिरानी कथा
ईमाम मामु म्हंजे आख्खा गावना ‘ मामु ‘ बरं का ..! बये ‘ ती तश्शीच काई मुर्ती व्हती मायन्यान कदी भो .
. सडसडीत बांधा ‘ आंगमा बंडी ‘ आखुड पायजमा ‘ आनी बंडी ‘ गालफडा बठेल व्हतात . धाकलसी नावले दाढी . भलता मवाय सोभाव ना व्हता . गोड सोभाव व्हता . माणुसकी काय म्हंतस हाई ईमाम मामु पाशीनच शिकाले जोयजे असच समजा तुमीन . ईमान मामुना येवसाय खाटीक ना व्हता . पन मामु आपला येवसायशी दूर दूर पये . त्याले या जीत्ता धाकल्ला धाकल्ला बोकड्या माराना ‘ त्या ईकाना जित्ता जीव माराना ? हाईच पटे नई . पन दखा मंडई ‘ एक खाटिक मानुस व्हईसन ज्यानावरच पोट भरानं हाई असं व्हईसन त्याले ते पटे नई . त्यानी आपला पिढी पार येल येवसायशी फारकती लेल व्हती . पन त्याना घर जोडे एक बिकेट व्हतं त्याना मांगेच मटननं मार्कीट व्हतं . त्यामा मामुनं दुकान व्हतं . पन मामु दुकानवर जायेच नई . त्याना मोठा पोरगा गफुर ‘ आनी धाकला गुलाब या दोन्ही ते दुकान सांभाये . गफुरले घाकला गुलाब मदत करे . ऐतवारे म्हना आडवारे भलती गर्दी राहे . . मामुस्नं मातर बिकीट जोडे धाकलसं दुकान टाकेल व्हतं . च्याहा ‘ साखर ‘ गुई ‘ मीठ ‘ मसाला ‘ तेल ‘ तुप ‘ गुई ‘ बठ्ठ बठ्ठ ठेल व्हते . जोडे आंगेच भिलाटी व्हती . भिलाटीना लोके वावरे ‘ खेते ‘ जंगलेसमा ‘ राबनारा जागल्या या येत दोन आनाना तेल ‘ मीठ मीरची साखर ‘ मीरची ‘ गुई लई जायेत. त्यासनं काय हातवर पोट राहे . पन तेच खरं मामुनं गिऱ्हाईक व्हतं . त्यासना वर भलता भारी भरे मामु . त्यासना आदर सत्कार आनी मामु गोड बोले . भिलाटी मा जाई ये झोपडी म्हा तिखट भाकर बी खायी ये . त्या लोकेसनं अन मामुनं नातं मस्त जमी गयथं . त्यासना दुख सुखमा मामु रमी जाये . लगीनमा रातले ढोलगी वाजीसन मामु नाचाले बी लागी जाये . बठ्ठ्या बाया तोंडले पदर लायी लायी हसेत . कोनी आजारी बिजारी राहेत तर मामु धायी जायेत. डॉ . कडे धाडेत . पैसा नई राहेत ते खिसा मा हात घालीसन पैसा बी देवाले मांगे पुढे दखी नई . . दुकानमा ईकरा पेक्षा मामुना उदार हस्ते मदतना हात मव्हरेच राहे . पोरेसले पटे नई . पन मामु काय पोरेसनं ऐकनारा व्हता का ? मामु जोडेच पाटील वाडा व्हता . त्या पाटील वाडामा राहेत . पाटील वाडामा मका पाटील ‘ म्हना की मोठी मोठी आसामी राहेत . मामु नं खाटीक नं घर एकटच व्हतं . पन मामु पाटील कंपनीमा रमी जायेत. तठे गोविंदा पाटील ‘ गंगाधर पाटील ‘ कथ्यु पाटील ‘ महादु दादा चौधरी या नामांकित लोकेसमा मामु रमी जायेत. पाटील कंपनी पन मामुना आदर करेत . मामुना सभावच भलता गोड व्हता . मामुना सभावच न्यामी व्हता . रस्साय सोभाव व्हता . कदी कोनावर डाफरना नई . उभरना नई . तठे गोंधई ‘ कोळी या समाजना लोकेसमा मामु रमी जायेत. गंगाधर कोळी मास्तर व्हतात सक्कायना पाह्यरे मामु वट्टावर जाई बसे . जुनं धुये तठ्ठे बठ्ठा अहिरानीच बोलेत . मामु पन अहिरानीच बोलेत . ते बी प्युव्वर अहिरानी . आख्खा शेतकरी ‘ मजुरी करनारा लोके व्हतात तठे . ढोरे ‘ ढाकरे बैलगाडा ‘ म्हसडा ‘ ढोरे ढाकरे हईच बठ्ठ जुना धुयामा दखाये . धार्मिक पन तसाच व्हतात आठला लोके . दर सरावन महिनामा श्री हरी नाम सप्ताह राहे . मंदिरमा बठ्ठा समाजना गरीब श्रीमंत बठ्ठा जमेत . तवय मामु ना मोठा सहभाग राहे ‘ . रोज मामु टाळ मुरदंग मा तल्लीन व्हई जाये . मामुना मनमा कदीच काई शिवनं नई ‘ अरे हाई ते आपला घरममा नई . ‘ असा मामुनी कदीच ईचार नई कया . सातवा दिन महाप्रसादना कार्यक्रम राहे मामानी झापाटा पासून धावपय राहे . घरोघर जाईसन भांडा ‘ मोठमोठाला बगोना ‘ पराती ‘ डेगा ‘ वगराया ‘ जमा करे . सैपाकना ठिकाने सोयता उभा राहे . बाबुराव बापुजी ‘ म्हना की जेठा मंडईसमान मामु रमी जायेत. सैपाक नी जबाबदारी पाटील जीभो ‘ भीवा मिस्त्री ‘ आनी ईमान मामू ‘ हनुमंतराव मास्तर ‘ बठ्ठा दखेत . वरन ‘ भात भाज्या बगोना असा भरी जायेत. भात करता मामु गाडानं साटलं पोरेसना मदत लीसन आनेत . त्या साटलावर नवं धोतरे शामराव दादा लई येत . आनी त्या गाडाना साटलावर धोतरे आथरीसन त्यानावर भात रचेत . मंग गावना आख्खा लोके त्या महाप्रसाद ना आनन लेत . संध्याकायले श्री हरीनी पालखी सोहळा भजन टाय मुरदुंग मा गजर मान बठ्ठा ताल धरतस . मामु बी रमी जातस . तल्लीन व्हई जायेत. आंगवर गुलाल पन पडी जाये . पन मामुले भान नई राहे तल्लीन व्हई जाये . इतलच काय पन पालखी ले खांदा लाईसन पालखीना भोई ईमाम मामु व्हतांना बराच लोकेसनी दखेल शे . जुना धुयाना लोकेसमा ईमाम मामू इतला रमी गयथात की ‘ ईचारू नका . मामुले एक एक घर नं नातं माहित व्हतं . कोनी चुलती ‘ कोनी फुई ‘ कोना जव्वाई ‘ कोना मामा ‘ भासा ह्या बठ्ठा नाता मामुले माहित व्हतात . पार चुल्हाना घरमा मामु चालना जायेत. थट्टाना व्हई ते मामु मस्करी करा शिवाय नई राहे . इतला मामु रमी जाये . एकदा काय झाये निंबा बोय धल्ली व्हती बिचारी . एखली राहे . तिले ना पोर सोर ‘ तिना नवरा कदिसना देवले प्यारा व्हई गयथा . केवट पानी करे . भाजीपाला नं टोपलं पाह्यटे फिराये . त्यानावर तिनं गुजरान चाले . एकदा काय झाये तिना चुल्हावर ती भाकरी टाकी राहायंती . भाकरी टाकाई गयथ्यात श्याक वघराई राह्यंती . पयखाट्या चुल्हामा लायेल व्हत्यात पयखाट्या कोल्ल्या व्हत्यात . पेट लेल व्हत्यात . तवसामा काय झाये कोन जाने बाजुले काड्या पयखाट्या पडेल व्हत्यात ‘ त्यानावर चिंगी पडनी . त्या कोल्ल्या पयखाट्यासनी पेट लिना . तवयच पेट धरा . निंबा बोय पयतच तोंड ठोकत घटना भाहिर पडनी . आख्खा गल्लीमा धूर भरी ग्या . उबाया दखी दखी गर्दी जमी गयी . मामु नं दुकान जोडेच व्हतं . तठे हाय व्हती . हायमा पानी व्हतं . तरून पोरे बादल्या लीसन त्या चेटेल घर वर पानी वतेत . मामु पन बादली भरी भरी हाय वरतीन भरीसन त्या चेटेल घर वर आग विझाडा करता कायपात करी राह्यंता . पन घरनी पेट लेवा मुये म्हना की काय घर नी नुसती राख रांगोयी व्हई गई . निंबा बोय ना काई आव्हढा सामान नई व्हता . पन राख रांगोयी व्हई गयथी . अशी तोंड झोडे का ईचारू नका . पन आते काय ईलाज व्हता का ? निंबा बोय नं घरच पार बेची राख व्हई गयथं . मामुनी आजु बाजुनी निंबा बोयले धीर दिना . मामुनी पोरगी कुलसुम निंबा बोयले घर लई गई . निंबा बोय तठेच राहयनी . पन मामुनी लोक वर्गनी गोया करी एक महिनाना अंदर अंदर निंबा बोयन चार भितीसनं वर पत्रा टाकीसन घर उभं करी दिनं . असा देव मानुस व्हता ईमाम मामु . निंबा बोयना पाठ मांगे भक्कम उभा राहयना . असा हाऊ ईमाम मामु व्हता . तो मानुस नई व्हता . फरिश्ता व्हता . देवदूत व्हता . कोना बी गरीब करता तो घावत जाये . त्यासना आसू पुसे . जातना मुसलमान व्हता . पन मानुसकी जपनारा व्हता . जात कदी त्यानी आडवी येऊ दिनी नई . असा होता आम्हना … ” ईमाम मामू ” ….!
विश्राम बिरारी ‘ धुळे . 9552074343 ……