कान्हदेश भूमी

खान्देशी अहिराणी कवीता कान्हदेश भूमी

कान्हदेश भूमी

मन्ही कान्हदेश भूमी, तिन्हा गुन गाऊ किती,
जशी दहीशे मुलायम, तशी कान्हदेशी माती.

आठेच नांदना कान्हा, चाऱ्यात तेन्हीबी गायी,
आहिर व्हतात तेस्नी, आहिराणी बोली झायी.
गोवर्धन पुजा आठे, गाय देवरुप व्हती,
मन्ही कान्हदेश भूमी, तिन्हा गुन गाऊ किती.

कान्हदेशी मानसस्ना, मन अच्छल निर्मय,
उभा ऱ्हातीन संकटे, नही भिती नही भय.
सुख दुःख दोन्ही सम, हाई आठलीशे रीती,
मन्ही कान्हदेश भूमी, तिन्हा गुन गाऊ किती.

गाव – खेडामा नांदस, घरेघर बंधूभाव,
अडीअडचन कोनी, लेस हिरदना ठाव.
नही आठे दुजा भाव, आठरापगड शे जाती,
मन्ही कान्हदेश भूमी, तिन्हा गुन गाऊ किती.

बळीराजानी जगम्हा, सदा कुचंबना झायी,
नेता शेत पडमथा, जपी ग्यात डोया लायी.
नही मानस तो हार, छप्पन इंची तेनी छाती,
मन्ही कान्हदेश भूमी, तिन्हा गुन गाऊ किती.

कष्ट करे रातदिन, कान्हदेशी दादा भाऊ,
सांगे जगले संदेश, घास ईमानना खाऊ.
सन आखाजी दिवाई, लेकीसूना गाना गाती,
मन्ही कान्हदेश भूमी, तिन्हा गुन गाऊ किती

© प्रा.बी.एन.चौधरी
    देवरुप, नेताजी रोड.
    धरणगाव जि. जळगाव.
   

खान्देशी अहिराणी कवीता