महाराष्ट्रना इत्यास हाऊ 80% खान्देशना इत्यास से

आचार्य आत्रे अस म्हनेत इत्यास निस्ता महाराष्ट्रले से बाकीनासले  निस्ता भूगोल से

भाग पहिला
           आचार्य आत्रे अस म्हनेत इत्यास निस्ता महाराष्ट्रले से बाकीनासले  निस्ता भूगोल से. खरी गोट से. इत्यास निस्ता महाराष्ट्रानी घडायल से. नी या इत्यासमा 80% इत्यास खान्देशना से.
         महाराष्ट्रन सोतान राज्य व्हवाले जोयजे हाई कल्पना ज्यांनी पयले मांडी त्या महालिंगदास अहिरराव वाडे ता भडगावना व्हतात. त्यास्नी मराठी साहित्यमां क्रांती करी भक्ती मार्गना भायर जाई ज्यांस्नी पाहिलेन्ग मराठी भाषामां लिखाण कर त्या महालिंगदास  सेत.
       महान इत्यासकार नारायण गद्रे यांस्नी त्यासन पुस्तकं, महाराष्ट्र महोदयांचा पूर्वरंग यामा लिखेल से कीं, भरतमां राष्ट्रवाद युरोपम्हाईन नही उना महालिंगदास अहिरराव यांस्नी सर्वात पयले भारतमा राष्ट्रवादनी मांडणी करी. त्यास्नी पाच गद्य संस्कृत ग्रंथसन मराठी पद्य ग्रंथमां रूपांतर कर. पंचोपाख्यान, पंचतंत्र, सिंहासन बत्तीसी, शालीहोत्र नी चाणक्य नीती या त्या पाच ग्रंथ सेत. त्या पायकी, पंचोपाख्यान ग्रंथ वरथुन शिवाजी महाराज यांस्नी आज्ञापत्र राज्य घटना तयार करेल से.
           महालिंगदास अहिरराव नी वेरूळना पोलीस पाटील बाबाराजे भोसले यांसना घरोबा व्हता. त्यामुये बाबाराजे भोसले यांस्नी त्यासना दोन आंडरो मालोजीराजे भोसले नी विठोजीराजे भोसले यांसन सिक्सन महालिंगदास यांसना कडे कर. वेरूळ ते वाडे या म्हातल अंतर 80/90 किलोमीटर से. तसेच दोन्हीन कुलदैवत एकच शिखर शिंगणापूरचा शंभु महादेव हाऊ व्हता.  त्यामुये त्या कायम एराएरना संपर्कामां व्हतात.


        महालिंगदास यांस्नी मालोजीराजे नि विठोजीराजे यांस्ले बठ्या ईद्यास्मा पटाईत करात, नि लखूजी जाधव यांसना सेनामां कामले ठेवात. लखूजी जाधव या सिंदखेडराजाना मोठा सरदार व्हतात. त्या निझामनी कडे कामले व्हतात.
          दिल्लीना तख्तवर तंवय शहाजान बादशहा व्हता. त्यांनी दोन लाखनी अजिंक्य फौज निझामवर चाल करी उनी. निझाम कडथून लखूजी जाधव लढत व्हतात. लखूजी जाधवनी सेनामां मालोजी नि विठोजी या बलाठी इर आघाडीवर लढत व्हतात. त्या युद्धमां मालोजी नी विठोजींनी जबरदस्त कामगिरी करी. मोगल सेनाना भयाण पराभव झाया. मालोजी नि विठोजी यासनी बहादुरी दखी निझामनी मालोजी राजे यांसले सेनामां पंच हजारी पद दिन.
         त्या मालोजी राजे भोसले या वेरूळना पोलीस पाटीलना पोरे व्हतात. वेरूळ हाई गाव खान्देश नी मराठवाडा यांस्नी शिव वर से. वेरूळ मराठवाडाना ज्या कन्नड तालुकामां येस तो कन्नड तालुका आर्धा अहिराणी बोलस नी आर्धा मराठी बोलस यांना आर्थ भोसले घराण मराठवाडान बी से नी खान्देशन बी से. म्हणजे मालोजी राजासले आपुन खान्देशी म्हणू शकतस.
         या खान्देशी मालोजी राजासले निझामनी सुपे पुनानी जहागिरी दिनी. मालोजीराजे इंदापुराना युद्धमां माराई ग्यात. तंवय त्यांसना अंडोर शहाजीराजे भोसले नादान व्हतात. तरी निझामनी, सुपे-पुनानी जहागिरी बाल शहाजीले बहाल करी टाकी नि विठोजीराजे भोसले यांसले अज्ञान पालक म्हनिसनी कारभार दीना.


क्रमश:
बापू हटकर

अहिराणी बोली लेख/कवीता/गोष्ट

तारीख १४ आन महिना फेब्रुवारी म्हन्जेच प्रेमदिवस शे

अहिरानी कवीता माहेर

खेती खेडी ऱ्हायना बैल

खान्देश जत्रा ग्लोबल खान्देश मोहत्सव

Khandeshi Ahirani Kavita

Khandeshi Ahirani Poem

Ahirani Blog

Khandeshi Blog