चष्मा अहिराणी कवीता
चष्मा
खेळ कसा नजरना
जाई दिव्य दृष्टी वर
चष्मा घालस सत्याना
जगी ताठ मान कर…!!
भेद करू नको देखू
साफ नजर डोयामा
फय भोगसी कर्मान
ध्यान ठेव जीवनमा…!!
चष्मा नको तो तुटका
हुई आयुष्य फुटका
टाके नजर वाईट
पडी तुनाच खटका…!!
रंग चष्माना बराच
दाये रंग न्यार न्यारा
कधी उजाय सावली
चष्म्याघाई मार्ग धरा…!!
आंध्याले देस तो साथ
निट वाटचाल धरी
डोया हुईसन आंध्या
शोध चष्मानी का करी…!!
घाल चष्मा तु चांगला
कर आदर नारीना
नको टाकू दृष्टी हीन
चष्मा वापर भारीना…!!
विनोद बी.सोनवणे धुळे
दिनांक =०७-१०-२०२४