सन उना रे पोयाना BailPola
॥॥सन उना रे पोयाना॥॥
सन उना रे उना रे
उना सन रे पोयाना
नही सापडस याले
पन भादाना महिना॥धृ॥
गानं खुलनं गयाम्हा
सन येताच पोयाना
सन कष्टकरीना से
याले आनंद व्हयना॥१॥
काय सांगू व आनंद
नही कोठेच म्हायना
नही धरतीम्हा नही
आभायम्हा समायना॥२॥
सर्जा राजाना गयाम्हा
माया घाला घुंगरुन्या
आज खावाले भेटी रे
याले पोया पुरनन्या॥३॥
सालभर बयी संगे
झिंजायना झिंजायना
आज यासनं से राज
बैल राजा से पोयाना॥४॥
कधी नांगरले कधी
गाडीलेबी जुपायना
सजी सवरी गावम्हा
देखा आज मिरायना॥५॥
सन उना रे उना रे
उना सन रे पोयाना….
–निसर्गसखी सौ.मंगला मधुकर रोकडे.
शब्दसृष्टी, प्लाॅट नं.७अ, नारायणनगर, धरणगांव चौफुलीरोड, एरंडोल जि.जळगांव.
दूरध्वनी क्रमांक :- ९३७१९०२३०३.
॥॥॥॥॥॥॥॥॥॥॥॥॥॥॥॥॥॥॥॥॥॥॥॥॥॥॥॥॥॥
बैल पोया..
आमावशा हाई श्रावणी
आम्ही सेतस ॠणी तुना
तुले पुरण ना आज नैवेद्य
मान ठेव घर धनीना…!!
कष्टकरी बईराजा
पोया सण ह्ऊ आंनदना
दिवा उतारस रानी
घास पुरण पोळीना…!!
करा अंगोई बैलेसनी
खांदा रगडा तेलवरी
मान आज तुले शोभे
नंदी पुजे करभारी…!!
सण पोया ऊना आज
उनं उधाण दुनियाले
चला सजाडा नंदिले
साज चडावा बैलेसले…!!
माया गयामा घुंगरूनी
काच रंगी गोंडा डोया
झुल शोभे पाठवर
सर्जा नटना हो भोया…!!
राब राबस घरले
खरा आधार बयीले
धन्या मन्हा तू मोलना
झाया आनंद मनले…!!
रंग रंगोटी करा शिंगले
फेर मारस मारूतीले
दोनी धव्या पिव्या सर्जा
तुम्ही राजा शोभनात घरले…!!
वाजा वाजत गाजत
निघे वरात सर्जानी
गाव तोरण तोडीसन
मस्त मिरवणूक निंघनी…!!
बैल पोयाना सणले
येस आंगमा स्पुर्ती
आलोकिक गोड गोडी
राहो सदा नंदिंनी किर्ती….!!
ईळा पिळा टयो समधी
खुशी ना दिन येवो बयीन
हात जोडस आमावसले
साल येवो भरभराटीन…!!
✍️Psi विनोद सोनवणे धुळे
दिनांक =२२-०८-२०२५