भवरा सोनाना तोलना
डॉ.ज्ञानेश दुसाने सर यास्ना ‘भवरा’ अहिराणी कथासंग्रह सोनाना तोलना
नानाभाऊ माळी अहिराणी कथासंग्रह भवरा सोनाना तोलना
धुयानी माटी पायले चिटकी ऱ्हायनी!मनल्हे चिटकी ऱ्हायनी!कायेजलें चिटकेल से!कोनी कितला का लामेनम्हा जाये काना,फिरी-फुरी मन आनी पायलें धुयाले व्हडी लयेस!जठे जनम व्हयना,धाकल्पने शिकनूतं,तठे फिरीफुरी पाय व्हडी लयतस!
डॉ. ज्ञानेश दुसाने
डॉ. ज्ञानेश दुसाने सर १९७७ फाइन पूनाम्हा सेतस!दूर फारीनम्हा जायी उनात MBBS, MS, FAIS, FICS, FIAGES, DAEG इतल्या गंजज मेडिकलन्ह्या डिगऱ्या लिसनी पूनानां हडपसर भागम्हा ‘श्रद्धा’ नावन्ह मोठ्ठ हॉस्पिटल हुभ करेल से!हॉस्पिटलन्ही गिरजदारी मांगे लायीस्नी साहित्यानी वारी भी करी ऱ्हायनात!लिखी पूसी चांगला इचार मांडी ऱ्हायनात!
डॉ. दुसाने सरस्ना दहा-बारा वरीस आदूगर ‘टेन्शन नही लेनें का’ हावू मराठी कथासंग्रह प्रकाशित व्हयना व्हता!त्यान्ही आखो एक आवृत्ती प्रकाशित व्हयनी व्हती!त्याचं बट्ठया कथा अहिराणीमा रुपडं बदली येल सेतीस!आज दिनांक ०२ मार्च २०२४ से!आजचं धुयालें गरुड लायब्ररीना आंगे आय.एम.ए. सभागृहम्हा त्यास्ना अहिराणी भाषाना ‘भवरा’ काव्यसंग्रह प्रकाशित व्हयी ऱ्हायना!त्याबद्दल थोडंसं!
भाषाना ‘भवरा’ काव्यसंग्रह बद्दल थोडंसं!
तान तनाव आपली जिंदगीनां हिस्सा सेतस!या बयजबरी मांगे लागेलं
ऱ्हातसं!व्हाडी ठेयेलं ऱ्हास!त्याले कितलं भी दूर झटकाना अवकाया कयात तरी भी त्या बयजबरी चिकटतीसचं!जिंदगी तान तनाव लिस्नी मव्हरे सरकत ऱ्हास!त्यांगंम कसं दखो?त्यास्ले रट्टा दिस्नी, शेपाली-सुपाली कव्हयं गोडी गुलाबीम्हा सवरायी-सुवरायी लेवो!सोता सुधरी जावो!आपला नजरिया बदलतं ऱ्हावो!तेचं मज्यानं वाटस!
आक्सी छातीवर,मनवर बिनकामनं व्हझ लिस्नी दडपयेलनां मायेक ऱ्हायनं ते जीव्वर येल जिंदगीनां कटाया यी जास!थोडंसं आपुन आपले बदली दखो!टेन्शन नई लेने का!बठ्ठ मज्यानं व्हतं ऱ्हास!आपला मुचूक कोन्हचं घोडं आडत नयी!ठेचं लागी मव्हरे जात ऱ्हातसं!जखम व्हयी!जिंदगी मव्हरे सरकत ऱ्हास!हासी-खुशी, आसूंस्ना वघय गालवर लिस्नी जिंदगीनी नाव खोल नदीम्हा भावराम्हा सापडी जास!गोलगोल फिरावस!भवराम्हायीन वाचाडी तथाना काटले लायी देस!खिय्या खुपसेल लाक्कुडना भवरां गोलगीटिंग फिरत ऱ्हास!फिरी फिरी, फिरायी-फुरायी व्हढेलं दोरनी नेम्मन गती सरनी का आंग टाकी लुडकी जास!
जिंदगी भवरांगतं से!
जिंदगी भवरांगतं से!फिरता-फिरता फिरावंतं ऱ्हास!आपुन सावलीन ठिकान देखी हुभ ऱ्हायी जावो!हासी-खुशी राजीनां दिन मस्तंग काढत राहो!न्यामिना संदेश देणारा अहिराणी भाषाना अस्सल कथासंग्रह से ‘भवरा’!कथा संग्रहानां लेखक महाराष्ट्राम्हाचं नई ते देश-विदेशम्हा नवाजेल सेतस! त्या मेडिकल सर्जन आदरणीय डॉ.ज्ञानेश दुसाने सर अहिराणी
मायलें कधी पाठ दिन्ही नयी!भूमी सोडी वर उडनात नयी!पाय जमीनवर ना जमीन वर सेतस!पुनाम्हा अहिराणी मायनां झेंडा धरी हुभा सेतस!
सत्तर टक्का डाक्टरेंस्ना आक्सी तोंडंवर बारा वाजेल दिखतस!इतला गंभीर चेहरा लयी फिरतंस!जसी काय जग दुन्यानं मोठ्ठ दुःख लयी फिरतंस!पेशन्ट ते ऱ्हावू द्या हो!डाक्टरलें दखी पेशन्टन्हा नातलग घाबर्या-घुबऱ्या व्हयी जातंस’आपला पेशन्टन्ह काय खरं नई बवा’? आशी भ्यायी जातंस!पन आळंदीनां संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यासन नाव लिस्नी,भक्तीनी खोयम्हा ‘श्रद्धा’भरी,पेशन्टलें हासी- खुसी वाचाडी,देवदूत बनेल आदरणीय डॉक्टर ज्ञानेश दुसाने सर यांसना चेहरा दखी सरगाना रस्ते लागेल,मव्हरे जायेल पेशन्ट १०० टक्का मांगी फिरी येस!डॉ.भाऊसाहेब ज्ञानेश दुसानेसर हासी खुशी पेशंटलें दुरुस्त करी आनंनंम्हा घर धाडतस!
अहिराणी भाषमा १२ कथा लिख्यात
डॉ दुसाने सर मानसेस्ना मनम्हा धिरेजकरी गुसतसं!कायेजलोंग भिडतस आसा या देवमानोसनां माय जन्मानी अहिराणी भाषमा १२ कथा लिख्यात!त्या बट्ठया कथा सुखानंदनं झाड लायीस्नी,हसरा फुले उमलायी जातीस!आपला तोंडवर मस्तंग थंडगार पानींना हालका-फुलका फवारा मारी जातीस!’टेन्शन नई लेनेका’आसं सांगी भवरांगतं फिरवात ऱ्हातीस!बट्ठ्या १२ कथा आल्लग-आल्लग बी बिवारा पह्यरी हाशी खुशीनां न्यामिना संदेश देत मव्हरे सरकत ऱ्हातीस!
कथा जपेलल्हे जागे करतीस!
पडमथ्यास्लें चांगल्या आनकुचीदार शिंगडाघायी घोमालानं काम करतीस !येडाचाया करनारा आधरमीस्लें शिंगाडेघायी बमकाडानं काम करतीस!बट्ठया कथा आपला रुपडाम्हा फसाडी नेम्मन हाशी-खुशी डोया हुघाडानं काम करतीस!हार एक कथानं कथाबीज,आशय मनल्हे भवरांगतं गोलगीटिंग फिरावत ऱ्हातीस!डॉक्टर ज्ञानेश दुसाने सर डॉक्टरीम्हा जितला नामवाला सेतंस,परसिद्ध सेतंस,मेडिकल क्षेत्राम्हा न्यामिनी ख्याती से त्यानंथुन त्यास्न्या कथा उज्जी ख्याती करतीन आसं मन्हा अंदाज से!कथा मानोसन्ह्या मनन्ह्या नेम्मन औसध सेतीस!हार एक कथास्मा शांतीनां थंडागार शीतडा सेतंस!उबगेल ताता बयेतालें थंडगार शीतडा मारत ऱ्हातीस!कव्हयं हिरदले गदगुल्या करी उक्कय फोडतीस ते कव्हयं गयाम्हा हुंडूक दाटी येस,गह्यरं दाटी डोया वल्ला करतीस!जिंदगीनां अर्थ सांगी निंघी जातीस!
बट्ठया कथा आशयघन सेतीस!सोनाना आस्सल अहिराणी सबद लयी फिरतीस!मायबोली जित्ता कायेजन्ही अहिराणी भाषा पह्यरी भाषिक अभिमान हुभा करत ऱ्हातीस!बट्ठया घटना,कथासार खान्देश भूमीनां भौगोलिक इलाखाम्हान्या सेतीस!एक एक कथा वाचनारलें गुंगायी ठेवतीस!लेखक वाचकस्नी नेम्मन नाडी धरेल से!
कथा लेखक यास्न धाकल्पन धुयाना
कथा लेखक डॉ.दुसाने सर यास्न धाकल्पन धुयाना मोगलायीम्हा जायेल से!घरमा बठ्ठाजन अहिराणी माय
बोलीम्हा बोलेत!जनमनां संस्कार जिंदगीभर संगे मांगे फिरत ऱ्हातसं!वाड वडीलनी वाडे लायेलं माय अहिराणींना गोडवा आमरूदनां गत से!भाषा यव्हार आनी जित्त ऱ्हावानी वयख ऱ्हास!वल्ला कायेजन्हा जित्ता सबद आपला मुसडाम्हायीन व्हट बाहेर कुदी नींघतसं तव्हयं ती भाषा जित्ती ऱ्हास!कुदायीव्हरी खंदी खंदी जमीन उकरत ऱ्हावो तशी भाषा उकरी -उकरी जुन्नाट सबद ‘भवरा’ दिखतस!भवरा हिरदम्हा घुसी नाची कुदी हासी कुदी डोया वल्ला करी मव्हरे निंघी जास!
कथासंग्रह खुशीन्ह औसद
डॉ ज्ञानेश दुसाने सर यास्न्या अशा बारा कथास्ना कथासंग्रह खुशीन्ह औसद से!मन आनी तनन्ह दुःखनं चांगली करतीन!हसता हसता सुख दुःखन्हा मार्ग दखाडी नजर देत ऱ्हातीन!इनोदी ढंगथुन टेन्शन नई लेने का म्हनत वाचक,रसिकन्ही नाडी नेम्मन धरीस्नी दुःख दूर तंगाडतीन आनी भवरा टेन्शन फ्री जगान्ह नेम्मन औसद व्हयी असा “भवरा”नां प्रकाशन समारोहलें हिरदथून आरस्तोल करस!हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतंस!
… नानाभाऊ माळी
मु पो ता शिंदखेडा जि धूळे
(ह.मु.हडपसर,पूणे )
मो.नं-९९२३०७६५००
दिनांक-०२ मार्च २०२४
अहिराणी कवीता पक्षांतर अहिराणी कवीता त्या दिन ग्यात माव्वी कान्हदेश भूमी