नको अंत देखू ahirani song lyrics
नको अंत देखू…ahirani song lyrics
हाल मन्हा रे बयीना
नको रे तू अंत देखू
बठ्ठा चोर आठे हुभा
नको तू रंगत चोखू…!!
नही वाली तेना कोनी
वारा वरनं जीवन
कसा डाव साधतस
काय म्हनो तेन मन…!!
चारीकडे पिडायेल
घुटी घूटी रे जगस
दिन रात एक तेले
इच्छा मारी तो जगस…!!
अवकाळी पावसाया
वल्ला दुषकाय ऊना
येल घास हिसकावा
सदा कदा हाल तेना…!!
पोरे सोरे खुशी साठे
आंगे फाटेल कपडा
गया हिवाया हंगाम
टांगा उलटा सुपडा…!!
टक लाई वर देखे
कोल्ला आभय पयस
पिक लागे सुकावाले
तेनं काईज बयस…!!
ऊना दुष्काय हंगामे
सरकार हाल करे
भेटी मदत शासनी
त्याच देखी देखी झुरे…!!
चिडी तोंड वासी बसे
दोन घोट पानी भेटी
करी शासन मदत
गोट हाई बठ्ठी खोटी…!!
✍️Psi विनोद सोनवणे धुळे
दिनांक =२३-०७-२०२५