धाकलपण ahirani song lyrics
धाकलपण
दिस धाकलपनना
लई व्हतातं भो गोड
चिंचा ,जाम ,बोरं आंबा
अन कैरीनी ती फोड ॥
माय- बानी गरिबीनी
कधी वाट्नी नही लाज
उत्नू नही मात्नू नही
कधी कया नाही माज ॥
नायलाॅननी थैलीले
धिमाखातं मी मिरायं
माटीमजार पहिलं
माय अक्षर गिरायं ॥
गावशिवना मजार
एक व्हता मोठा पार
सुखदुःखनी घडीले
व्हये गाव भागीदार ॥
आणवाणी पायवर
बांध बांध तुडायात
भोयाभाबडा मास्तरनी
पिढ्या आमन्या घडायात ॥
आखाजी अन दिवाळीले
गणगोतं व्हये गोळा
भेठीगाठी व्हयेत नी
भरी इयेत या डोळा ॥
माय म्हणे मले सदा
शिकीसन मोठा व्हयं
गरिबीना चटकास्नी
तुले लागू नोये झयं ॥
तीना काठोडना व्याप
आख्ख ब्रम्हांड व्यापस
मनी मायना घरात
दैव भाकरी थापस ॥
काळ थांबनार नही
जरी कयात नवस
नही परत येणारं
तशा सोनाना दिवस ॥
कु. सौरभ हिरामण आहेर
गाव – तिसगाव
ता- देवळा
जि- नाशिक
९८३४३४७८३३