ahirani quotes ज्योशिबा संस्कार मायममतानं जोड निर्मय नातं
मायममतानं जोड निर्मय नातं,
कधी कोना आदर इश्वास तोडू नको…
मनपाकभाव, तत्व निष्ठा जप सदा,
कधी साथ कायजीदारस्नी सोडू नको…
इमानदारीथुन मेहनत कर,
कधी कोनं भरेल घर फोडू नको…
सच्चाईथुन नितीमत्ता श्याबूत ठेव,
कधी चांगलं कोनं खुडू नको..
जितलं व्हई चांगलं ते धाड,
कधी वाईट काहीमाही धाडू नको…
कोनाबीगर काही ऱ्हात नही,
कधी मतलबपुरतं नकली रडू नको..
सारं भेटी तुलेभी, साथ संगत चांगली ठेव,
कधीभी कोनले नडु नको..
जलमनं चीज कर, ठेव हिम्मत,
कधी कोनले नाडू नको…
निस्वार्थ कायजी करनारास्नं
कधी कायज फाडु नको,
दोन दिननी जिंदगी हाई,जपीस रे गड्या इले कधी कोनले ठगाडू नको…
खिसा भरेलथून शोभा श्रीमंततीनी, खुशी ज्यांन घरम्हा,
हाई भान इसरू नको..
असली भावभक्तीम्हा माणुसकी शे,
नकली कधीभी आपलेपना दखाडू नको,
संयम, सबुरी कैक दि जाई तुले
नासेलपना करीन मन कोनं दुखाडू नको,
कर्म तूनं समता ममतानं ठेव,
चुकी त्याले तोंडवर गाया दे भले,
मांगे कोनले नाया पाडू नको…
सज्जन तू, सतकर्म तूनं धराई गितनीम्हा,
चांगलास्ना सल्ला, साथ उभारी कधी सोडू नको…
✒️®लेफ्टनंट डॉ.जितेंद्र देसले