Ahirani Poem फॅशन
भला भला लोके सांगतस दुन्या घडनी,
न्यारी न्यारी फॅशन करी कशी बिघडनी.
डोकाभरी पदर हाये मन्ही मायना,
दिखाये नही नख कोनले तिन्हां पायना.
नव्वारी लुगडं धोतर बंडीनी झायी चोरी,
आर्धी चड्डी घालिसन फिरतस पोरंपोरी.
नाकात नही नथ नही हातमा बांगड्या,
गल्लीधरी फिरतीस काही बाया रांगड्या.
ब्युटी पार्लरमा व्हस दादा बहू दाटीवाटी,
लंबा लंबा काळा बाले उनी ती छाटी.
लालभडक कुकू व्हतं सौभाग्यनं लेनं,
सांडायी गया कथा नही कोनले लेनदेनं.
मोठी बायजा लाये लाये सोनी धाकली,
न्यारा न्यारा रंगनी ती कप्पाये टिकली.
फॅशनना नावखाले हायनात बिघडी,
भाऊबहिनी करु नका सरम उघडी.
आंगभर कापडं घाला नका आशा फिरु,
दुसरानं दखी नका काहीबाही करु.
कैलास संतोष भामरे (वाखारी) लासलगाव ९४२०७२७२८८