Ahirani Poem जसं कर्म करश्यात तसं फय भोगश्यात
!! जसं कर्म करश्यात तसं फय भोगश्यात !!
लाडी लबाडी कर्शात
वर देव पूंजश्यात
सोता खंदेल खड्डाम्हा
सोतालेच बुंजश्यात
परस्त्रीले बयजब्री
कलंकित करश्यात
मावलीना शाप लागी
पाप कथा भरश्यात?
पेट्या नई चालतीस
खोका कित्ला वाटश्यात?
येरायेर्ना पत्ता सांगा
कवधूर काटश्यात?
आधिकार्ना बयवर
उड्या कितल्या मार्शात?
जेलम्हान जाईसनी
उठबश्या घालश्यात
घोटायास्ना जंजायना
खाईम्हान पडश्यात
लालू यादव सारखा
सालेसाल सडश्यात
लावालाई करीसनी
तोंडघसी पडश्यात
एकदिन सोतानाच
कुटुम्बले नडश्यात
भाग्यम्हाना भोगेसले
कदलोंग टायश्यात?
जसं कर्म करश्यात
तसं फय भोगश्यात!
शिवाजी साळुंके, ‘किरन’
च्याईसगाव, जि. जयगाव.
1 thought on “Ahirani Poem जसं कर्म करश्यात तसं फय भोगश्यात”
Comments are closed.