भावड्यासहोन ahirani language sentences
भावड्यासहोन!
आव्हढा जीवल्हेना चुल्हाम्हातला तपता उबयाम्हातला लालजरक हारनामायेक उन्हायाम्हा *पानी, उन्हायान्या सुट्या, वियदगंगा वृत्तवर्हनी भारी अहिरानी गझल आसा भू नाजूक विषय मव्हरे ठीसनी मव्हनदादा कवळीथकर आन सुप्रसिद्ध कवी, गझलकार देवदत्तआबा बोरसे, काई जो सदान कदा फिरस्ताच र्हास पन भू भारी गझला लिखंस आनी गोड आवाजम्हा म्हनीसनी आपला कानेसम्हाईन घुसीसन मनलगून भिडस तो विजयदादा निकम यासनी भू न्यामिना इच्यार मांडीसनी साहित्यिक कर्तव्यबुद्धीना संगेमंगेज सामाजिक प्रबोधनबी न्यामिनं करायेल दखायनं आज! मान गये ये तिनों अहिरानी मराठी में बहुतही बढिया लिखनेंवालें सरदारोंको!
साहित्य मंगन ते गद्य, पद्य, ललित, कथा आसा कुठलाबी प्रकारनं र्हावो त्याम्हाईन वाचकसना मगजले भरपूर चारापानी खावा पेवाले भेटालेच जोयजेल नई का? खरी गोट से ना हाई? आजना दिवस जितला ईस्तुनामायेक हुभारा देन्हारा व्हता तितलाज आत्माले संतोस देन्हारा थंडा थंडा गारेगारबी व्हता!
भावड्यासहोन!
तुम्हीनबी आसंच परसंग दखीसन नेम्मन लिखत जावा!
जबरानजोत उठ सुट कोनताबी विषयवर लिखापरीस हाई वास्तववादी सामाजिक समस्यासवर्ह्न (समस्यासवर्हनं) लिखान मनले भू समाधान ते देसच देस वरथीन गंभीर सामाजिक समस्यासवरबी ईच्यार कराले लोकेसले भाग पाडंस.
आज मी झाडेसले पानी देवाना गुन्ता बोरींग मशीननं बटन दाबं आन मोसंबी, आंबा, लिंबू आन पपईना झाडले पानी दीज र्हायन्तू तवसाम्हाज पानी येवानं बन व्हई ग्ये. वरते दुसरा माळावरते ठेयेल पानीनी टाकी कितली भर्नी हाई दखाले बॕटरी ल्हीसनी गवू ते तठे काय दखस? बैजू ती आर्धीनिर्धीच भरायेल दखायनी! जिमिनम्हा जठलगून बोरींगनी मशीनना पाईप व्हई आन तठे पानी व्हुई तठलगूननं पानी तिन्ही व्हढी घिदं आन त्येन्हाखाले जर पानीच नै व्हुई ते ती हाजार लिटरनी पानीनी टाकी भराईच कथाईन हो? सांगाना? कथाईन भराई? तधय त्या बागलानना देवदत्त आबा बोरसेनी पानीवर्हनी कईता माले एकसाय नाया पाडाले लागनी! आसा फजितवाडा झाया भावड्यासहोन मन्हा!
ते भावड्यासहोन!
आसी गम्मत से! तुमीनबी जरा ध्यानखाल पानीना वापर करत जावा बर का! नै ते पोट रिकामं कराले बठस्यात आन ऐन धवाना वखतले पानीच गायब! नई ते मन्ही आज झाई तसी फजिती व्हवाले काईज येळ वखत लागाव्ह न्हई! चला भो! आते त्या बोरींगवाला भावड्याले काई त्या प्लंबर दादाले फोन लाईसनी त्येसन्या रावन्या करन्या पडथीन नै ते पानीना नावनी बठ्ठी बोंबाबोंब व्हईजाई. सलं एक बरं झायं का आज तुम्हनी मावशी तिबाक नासिकले जायेल से, नै ते ती मन्हा चांगलाज पानऊतारा काढाबिचूक नई र्हाती भो मायन्यान! आन आसा मोकानी ते ती आदराई वाटच दखत र्हास जधय तधय! *(हाई गोट मातर तिले सांगज्यात बिंगज्यात नका बरका! नै ते दिश्यात आम्हना दोन्हीसम्हा आग लाई भडका उडाई!)*
बरं ठेवस आते!
तुम्हनाच!
शिवाजीआप्पा साळुंके,
गाव तेच चार दिनम्हा एक सवा एक तास भर पानी येन्हारं *च्याईसगाव.* आन जिल्हा तोच उन्हायासारखा तयतयाट करन्हारा, तवानामायेक तपी तपी तिरेच्याईस डिग्रीनाबी वर जाई जाईसनी जयफयाट करन्हारा जयगाव.