ahirani language sentences आभिष्टचिंतन मा.आप्पासाहेब श्री.रमेशजी बोरसे
आभिष्टचिंतन मा.आप्पासाहेब श्री.रमेशजी बोरसे
मा.आप्पासाहेब श्री.रमेशजी बोरसे…
“विंचुरना तुम्ही भूमीपुत्र
माय अहिरानीना पुजारी
गाजाडी राहीनात साहित्यक्षेत्र
खांदेसभूमीना तुम्ही वारकरी..!”
आप्पासाहेब..आज तुम्हना ७७ वा वाढदिवस..माणसं कयीक जलमले येतस अनी जगता जगता सरी जातस..पण काही तुम्हनासारखा देवमाणसं नदीसारखा राहतस..त्यास्ना जीवनना वाहता प्रवाहमा कयीक आडचणीस्ना अनी वाट रोकणारा काडीकचरा,संकटस्ना दगड येतस..पण त्या कचराले अनी दगडस्ले न भ्याता काठवर फेकी देतस..अनी बिंधास्त ज्ञानना अनी पिरीमना निर्मय मनना आम्हनासारख्या धाकला-मोठा तलावस्मा,हेरीस्मा,पाटस्मा,वावर शिवारस्मा जिव्हायानी वल भरीसन ग्यानना समींदरमा येकजीव व्हयीसन त्याले खुप मोठा कराले निंघी जातस..
म्हनीसन जगदुन्या त्यास्ले ज्ञानसागर म्हणीन वयखस..”खांदेसनी वानगी”हाऊ तुम्हना कुशीमा वाढेल शिंपलाम्हाना अस्सल मोतीसारखा सगया जगले भुरय पाडणारा मौल्यवान दागिना शे.. अहिरानी साहित्य क्षेत्रमा कार्य करतांना सदाभाऊ सुर्यवंशी हायी आखो तुम्हना साहित्यमंथनम्हायीन आख्खा अहिरानी साहित्य जगतले लिखानं येड लावणारं..खांदेसनी भूमीवर चमकणारं आहिरानी भाषानं चौदावं रत्नचं तुम्हले लाभनं..अहिरानी भाषाना प्रसार अनी प्रचार करानं भयान मोठं काम येखादा सॅटेलाईटनागत हायी खान्देसनी वानगी करी राह्यनी..
सदाभाऊस्नी अनी तुम्हनी जोडी खरं ते नरवीर तानाजी अनी शेलार मामासारखीचं शे..खांदेस साहित्य संघनी माय अहिरानीनी गढी आज गांवोगांव मोठा दिमाखमा उभी राही राहीनी..मन्हासारखा कयीक साधासुधा लोखंडनागत तुकडास्न तुम्हनासारखा परीसमुये सोनं व्हयनं..जगतगुरू संत तुकोबाराय सारखाच तुम्ही अहिरानी दिंडीना ईचारवंत संत शेतस..
तुम्हनामुयेच आम्हनासारखा साहित्यवारीना वारकरीस्ले आज जगमा वयख शे..आप्पासाहेब आज फक्त तुम्हनं वय वाढनं पण साहित्यकामनी लय मातर तरना गडीस्लेबी लाजाडी दी अशी शे..तुम्हले वाढदिवसन्या खंडोगनीक शुभेच्छा..माय पेडकाई तुम्हले आंबरना पाटा देवो..तुम्हनं लेखन,ईचार,साहित्यकार्यना बागना सुगंध हुभा खांदेसमा कस्तुरी म्रिगनागत कायम पसरत राहो..तुम्हले शंबर वरीसनी हायाती लाभो हायीच पेडकाई मायना चरणे प्रार्थना..!
●देवदत्त बोरसे●
( नाशिक जिल्हाध्यक्ष )
खांदेश साहित्य संघ.महाराष्ट्र राज्य.
नामपुर.ता.बागलाण.जि.नाशिक.

खांदेशपुत्र बापू हटकर ७३ वं आभिष्टचिंतन