अहिराणी रचना जुना जमाना
जुना जमाना
एक अहिराणी रचना
फूटी गई बाडगी, . . .वाही गया रस्सा, सांगणारी काकू, राहीणी नही ।
थाटीभर रस्सा, एकच मासा, मडकाणं कालवनं गावमां नही॥
जलम जिंदगी, ढेकळं फोडामा, बापना यानी हयात गई।
सात नवसनं एकच लेकरू, माय बाप ले पानी मा पाही ॥
मायले माय, बाप ले बाप, पोऱ्या जुना राहीणा नहीञ।
एक घर ना दोन दार,सासूना हातखाल, वऊ नही॥
सात नवस ना एकच लेक, . . . मायबाप सांगे, सोना ना राही I
मनी वऊ, मना पोऱ्या, . . . म्हतारपनमा कोणी नही ॥
गावगाडाकार साहेबरावतात्या नंदन ताहाराबादकर नाशिक