अहिराणी भाषा आखाजी कविता
अहिराणी भाषा आखाजी कविता
आखाजी कविता
मु-हाईना येवा
काने उनी काव काव, उना आखाजीना सन,
येईन मु-हाई लेवाले, वाट देखे बहिननं मन.
चैत्र-वैशाखनं उन, तशी दाह सासरनी.
माय माहेरनं मन्हं, घागरनं थंड पानी.
भाऊ,भावजाई,भासास्नी, डोयाभरी भेट लेसू.
माय बाईना हातनी, पुरन पोई गरम खासू.
सख्या जमसूत सा-या, झोका मिसन खेसूत.
हासी खुशी मजाकना, गाना गौराईना गासूत.
आखाजी आखाजी, माय माहेरना सन.
जोडे माहेरनी नाय, आखाजीनं मन्ह गानं.
रात मायना मांडीवर, डोकं ठिसन जपसू.
मनम्हान जमेल सारा, तिल्हे उमाया सांगसू.
मन रिकामं करीसन, उमेद जगानी भरसू.
धनी येईन लेवाले, वाट सासरनी धरसू.
जग रहाटी चालीन, सन येतीन जातीन.
नातं नवं जूनं व्हईन. अंकूर जगाना फुटीन.
© प्रा.बी.एन.चौधरी.
देवरुप, धरणगांव.
जि.जळगाव.
४२५१०५.
(९४२३४९२५९३ )
आखाजीना सन
भावड्यासहोन नमस्कार! आख्खी जग दुन्याम्हा आपला खान्देशम्हाना हावू आखाजीना सन सम्दा सनेसथीन भू भारी शे! म्हनीसनी खान्देशन्या कुवा-या आन लगीन व्हयेल बठ्ठ्या पोर्हीसले, आया-बैयन्हिस्ले, म्हता-या कोता-या आजलीसले आखाजी भू प्यारी शे! हाई गानं लिखाले चौपन वरीस पुरा व्हई गयात. आम्हनं मूय तर्हाडथीन (त. शिरपूर) लक्षमा मामीनी वाटे लायेल व्हतं.
आज ती नई शे, पन तिन्ही याद वनी का डोयाम्हा टचकनी पानी येस! जीव कसा गलबलाले करंस! माले तधय माय माहेर कसाले म्हनतंस हाई खूप जवयथीन दखा आयकाले भेटनं व्हतं! आन हाई गानंबी आपेआप मनम्हान मनम्हा रुंजी घालाले लागनं व्हतं! १३ मे २०२४ ले आम्हना लगीनले पंचावन वरीस पूरा व्हुई जाथीन! हाई गानं जरा निचितवार वाचा आन खानदेसम्हा आपली पोरले लाडी
म्हनजे लाडकी लेक काबर म्हनतंस ते ध्यानम्हा ठेवा. आपली लाडीले चांगला जीव लावानं हाई माले खान्देशना आखाजीना सननी शिकाडं!
जय जय खान्देश! जय जय अहिरानी!!