अहिराणी बोली कविता मोबाईल
(अहिराणी बोली )
टी व्ही मालिका दखो तठे
ज्यानी त्यानी दुन्या न्यारी ,
सांगता येत नही कधय त्या
करथीन येरायेरवर खुरी …!
हेवा दावा आवडस कोन्ले
पैसावालास्ना रोज झगडा ,
बाह्या नही गया हासो का रडो
दखिस्नी आंगवरना कपडा ..!
त्यागी जिवडाले आटकायीस्नी
कपट कारस्थान करतस ,
दखणारस्ना डोयाम्हा आथा
बयेज आसू गयी र्हातस ….!
थोड्या खऱ्या थोड्या खोट्या
व्हतीन त्यानाम्हान्या भावना ,
पडदाम्हानं नकली जग इकाले
तठे आभासी बजार भरना ..!
टी व्ही गया नि मोबाईल उना
तोज माणूस त्याज बटने बोटे,
धाकला.. नैतरना संगे धल्ला
समदास्ले भलतीज हौस वाटे..!!
प्रा.रमेश राठोड