ahirani language मामासाठे भासा देवनामायेकज र्हातस
जिभाऊ नमस्कार
मामासाठे भासा देवनामायेकज र्हातस, म्हनीसनी मामानी मया कधीच पातय व्हत नई! आंडेर बेटी दीधी काय आन नही दीधी काय, तरी मामानासाठे भासा देवनी जागावरच र्हातंस! दखा त्या मामासवरी नेम्मन चालनंबी नही व्हस तरी त्येसनी काठी टेकत टुकत वावरम्हाईन तुम्हले मस्तपैकी आस्सल गावरानी कारला तोडीसनी आनी दिन्हात का नही? कितलंबी कयं तरी भासा हाऊ त्येसना बहीनना पोटे येयेल तिन्हाज पोटजाय से. तो मामा आपली बहीनना वाटानं वावरबी हासत हासत बहीनना नाये लिखी देस! आसा गनज भाऊ बहीन सेतंस, ज्यासनी येरायेरले व्हई तितली मदतच करेल से!
आखीरसेवट मामा तो मामाच र्हास. त्येन्हा जीव बहीन भासासम्हा गुतंसच गुतंस! म्हनीसन मामानी बदनामी कधीच नई करवो! सॉरी म्हना तुमीन!
मन्ही मायबी मन्हासाठे मन्हा मामानीच पोर करसू म्हनीसनी रुसी बठेल व्हती, मन्हा मामा नहीच म्हने, मामानी गनज समजाडं का दख बहीन, तू मन्ही पोरले व्हवू म्हनीसन जर गांजपाट करसी ते मी तुन्हा आंडोरसाठे मन्ही आंडेर देवाव नही. मन्ही मायनी मन्हा मामाले वचन दिन्ह, का
“मी तुन्ही पोरले मन्ही आंडेर समजीसनी चांगली वागाडसू!”* तधय मन्हा मामा राजी व्हयना आपली आंडेर देवाले.
आज मन्ही आस्तुरी छप्पन वरीसफाईन मन्हा सौसार समाई र्हायनी. मी गनज नखरा कयात, गनज मस्ती दखाडी, भानगडीबी गन कयात पन, तिनी माले कधीच आंतर नई दीधं. आज मन्ही माय आन मामा हयात नईत, पन त्यासनी आम्हले दोन्हीसले वज्जी याद येस!
आजकालन्या व्हवा ते थोडं काही कमीजास्त व्हयनं रे व्हयनं, का लग्गेज रिपोट फिपोट आन कोर्ट-कचेरी कराले तयार व्हई जातीस! सोडचिठ्ठी ल्हीसनी सडत बठतीस तथ्या!
हाई आसी गम्मत से जिभाऊ! आजकालनी!
तरी मी नईन पिढीले एक सल्ला जरुर दिसू का, बनस तवलगून मामानी आंडेर नही करवो, कारन जीवशास्त्रनुसार (according_to biological factors) ते चुकीनं से आसं डाक्टरलोके सांगतंस! मन्हा एक नातलगाना दोन्ही लेकरे जलमताच मुका आन बह्यरा सेतस! हाई फॕक्ट से!
गन लामेन लावाई गयी मामा आन भासासवरथीन! कटाया ई ग्या व्हई म्हनीसन थांबस आते!
तुम्हनाच दासभौ!
शिवाजीआप्पा साळुंके’
हाल्ली मुक्कामे- शिवसृष्टी कॉलनी, नासिक.