ahirani language कधी तीर्थाटन कधी पर्यटन

ahirani language कधी तीर्थाटन कधी पर्यटन

नानाभाऊ नमस्कार!

, कधी ऐतिहासिक ठिकानेस्ले जाईसनी छत्रपती शिवाजी महाराज आन इतर शूर वीर थोर महा पुरुषासेसना राजवाडा, गड किल्ला दखासाठे उन तान्म्हा घामेघाम व्हत लगून पाये पाये चालत जावानं, त्या गडकिल्लास्वर्ना शिलालेख वाचीसनी आम्हले वाचन्हारेसलेबी ते नीट समजाडी सुमजाडी सांगानं. मोठ मोठा मठेस्वर जाईसन तठला साधूसंतेसनं दर्सन ल्हेवानं. आसा नारा नारा जागे जाईसन म्हाईती गोया करानी.

ahirani language
ahirani language

सदा भटक्यासना मायेक पन कारनीक भटकत र्हावानं. आपला संगेसना लोकेसम्हा जनजागृती करत करत उद्बोधन करानीगुन्ता भूक तीस ईसरीसन आपला हेतु सफल व्हत लगून जीवना आटापिटा कराना, हाई वज्जी भारी काम बिलकुल नॉनस्टॉप चालत र्हास धन्य शे बाप तुम्हनी! आम्ही ते बठ्ठ वाची काढतंस, पन कधी आपलं मत जाहीर करतंस, ते कधी काहीच न करता निस्ता मनम्हान मनम्हा इच्यार करंत र्हातंस तो आसा का, हाऊ नानाभाऊ माळी का त्या मोबाईल फोनम्हा घुसीच बठेल र्हास का काय? बर ते ते, ते वरथीन त्या लेखबी गनज लांभा चवडा र्हातंस्ना हो! बैजू मानूस कदलगून वाचत बठी? ते आशी गंमत शे नानाभाऊ आम्हनी.

आज मी मुद्दामच लिखाले बठनू. त्येन्ह कारनबी तसंच शे! जसा तुमीन हामेशा लिखतंस तसा लेख नई शे हाऊ आजना! बिलकूलच हटके शे! माले ते नवलच वाटनं, का हमेशा पर्यटन, ट्रेकींग बिकींगवर लिखन्हारा नानाभाऊ आज आसा एकदम खेडाम्हाज कसा काय जाई भिडना?

मोल मजूरी करन्हारी माय सालदारी करन्हारना पोरगा भिला आन एकजमानाना गावम्हा आसकारेल, नवाजेल, ठठाराम्हा र्हानारा पाटीलंसना पोर्हे जगन आन तो जिभाऊ ह्या मोजमस्तीम्हाज, दांडगाया करत गाव डवरत र्हायनात, म्हनीसन त्येसले नीट शिकता नई वनं, आन त्या गावम्हानज म्हालपंच्यायती करत र्हायनात, पन भिला मातर शिकी सवरीसनी सहेरम्हा गया. आपल्ला धंदा पानीना नीट जम बठाडीसनी पैसा कमाडा.  जठे त्यान्हा बाप सालदारी करे त्यासनाच वावरे ईकत ल्हेवाना सपाटा त्यानी लाई दिधा! आपला मायबापनी नदारीना काय पलटाईसन नावलौकिकबी कमाडा!

नानाभाऊ! हाई गोट मी गनज जागे हाकीगतम्हा घडेल दखेल शे, म्हनीसन माले तुम्हनी हाई गोट भू म्हन्जी भूच आवडनी! हाई आपली जींदगी खरंच उन सावलीना खेय शे!
तुम्हले आन तुम्हना धारदार, उपदेसकरन्हारी, जीनगानिना सार सांगन्हारी तुम्हनी लेखनले आरस्तोल करंस आन थांबस!

शिवाजीआप्पा साळुंके,
च्याईसगाव,जि. जयगाव.