मन्ही गोटज शे न्यारी ahirani kavita lyrics
मन्ही गोटज शे न्यारी
मी रात दिन ना धनी
उंडाया,पावसाया , हिवाया
दिन रात सवय राबानी
S
उंडाया चटका गरम त्या झया
माटीना ढेखाये फोडो वखरीनी
वावर तयार करी वाट दखो
खोफा बनायि कवय त्या हाळ्यानी
U
पानी पडना सुगंध सुटना
चिलंग्या खायेत बैले माटी सुंगीसनी
पेरनी करी निघना माटीमयीन कोंब
नेसा निय्या शालू काया मायनी
N
उन्हा शरद ऋतू थंडी लयीसनी
करी तयारी गव्हू हरबरा पहिरानी
थर थर कापे मन्ह आंग रातले
बारा धरू लांगीमा उभा ऱ्हायिसनी
I
ऊन वारा पावसाया थंडी झेली
बाप दादा पायीन सवय राबानी
मन्ही नसासन्या एक एक थेंबमा
आत्मनिर्भर शेतकरीनी शे कहानी
L
मन्ही गोटज शे न्यारी
मी रात दिन ना धनी
उंडाया , पावसाया , हिवाया
दिन रात सवय राबानी
सुनिल पाटील , बह्याणे
ता , जि , नंदुरबार
9767144514