कायीचं बदलन नयी ahirani kavita
कायीचं बदलन नयी.
कायीचं बदलन नयी,
जसन तसंच से दुन्या बदली गयी,
धाकालपने सनवारले,
वरण भात भेटे खावाले.1
जीवारीनी, बाजरीनी भाकर,
हायीचं पूजेल पाचविले,
गुईना च्या,दिखे नयी साकर,
आते मातर बठ्ठ लागी गे भेटाले.2
पन ज्या वरणभात खायेत,
बाजरीना भाकरी आसडतस,
त्या दूध साखरनी च्या रुबाम्हा पेयेत ,
आते कायीमटक गुयीनी फुरक्या मारी पेतस . 3
धाकलपने बायसीकल डोयाले दिखे नयी,
आते मातर आम्ही फिरतंस चारचाकीवर,
तेसले सायकल सिवाय चैन पडत नयी,
हायी से कलियुगन चलीनतर.4
राहूत आम्ही धाबाना घरेसम्हा,
आते मस्त बंगला भांधी मिरतस,
तब्बेत साठे त्या ग्यात दूर झोपडीसम्हा,
तेसले पथ्य आम्ही मिटक्या मारी खातस. 5
म्हणून म्हनस कायीचं नयी बदलन,
डावान उजव उजवान डावं,
खांदे पालट व्हयी आंतर वाढणं,
हाऊ नियतीना खेय, तिन्हाच डाव. 6
रचनाकार
मझिसु प्रा. मगन सुर्यवंशी