ahirani kavita गोडीगुलाबीथीन ऱ्हावा भाऊसव्हन

ahirani kavita गोडीगुलाबीथीन ऱ्हावा भाऊसव्हन

गोडीगुलाबीथीन ऱ्हावा भाऊसव्हन

संजय धनगव्हाळ


जुनं साल गये आते
नवीन साल उन
राग रूसवा सोडी देवो
कसा करता करानं तुन मन

जे झाये ते इसरी जावो
मान पान देवाना सोडी
तू तू मैं मैं कराम्हा मजा नै भाऊ
प्रेमथीन बोलामा शे गोडी

काई बळे बळे भारी भरतस
काई नुसता भाव खातस
अरे दोन रोजना पाव्हाना या जगम्हा
कसा करता काना डोया करतस

सुख दुखनी घडी शे
आपलाच आपुनले कांम्हा येथीनी
अडी अडचण म्हा कोणी येत नै
आपलाच जिवलग संगे ऱ्हाथीन

रूसी फुगीसन कोन भलं व्हस् नै
झगडा कराम्हा काई भेटस् नै
गोडी गुलाबीथीन ऱ्हायनं म्हंजे
जिव जिव्हाळानं नातं तुटस नै

कोना सगा कोना सोयरा
कोनी कोनले व्हतस का
माणूसकी हायीच खरी श्रीमंत
कोनी काई संगे लै जास का

या स्वार्थी मतलबी जग म्हा
मतलब करता जोडे म्हनथीन
काडी नी माडी व्हैनी की मंग
अर्ध्यावर सोडी देथीन

म्हणीसन जसा माणसें
तसाच आपुनभी वागानं
कोणी कसा का ऱ्हायेना
संकट म्हा आपुन पुढे ऱ्हावानं

संजय धनगव्हाळ
(अर्थात कुसूमाई)

ahirani kavita
ahirani kavita