खान्देशी अहिराणी कवीता माय
माय तू कितला जीव लावस
तरी तुनं प्रेम सरस नै
तू डोकावर हात फिरावा बिगर
मन्ह मनं भरस नै
तुले देखीसन व्व माय
मना दीन सुरू व्हस्
तुना पायखालनी माती
मी कपायले लावस
माय तुना डोकावर्ला पदर
मना डोकावर छाया
तुन्हा ममता मा शे व्वा माय
जशी रखूमाई नी माया
तुना मांडीवर निजीसन
तू कितला लाड करस
लाडकोरना आंडोर तुन्हा मी
मन्ह मन्ह मी भारी भरस
माय तू सुपडावर सुख पाखडस
मी घट्यावर दुःख दयस
तुले हाशीखुशी देखीसन
मना गालवर हासू फुली येस
माय तुनी हयाती सरी जास
तरी तुन्हा ममताना झरा आट्स नै
तुन्हा बिगर व माय
घरले घरपण वाटस् नै
तुन्हा पायावर डोकं ठेयीसन
मन्ह आयुष्य वाढी जास
तुरे देखताच व्व माय
माले देव भेटी जास
संजय धनगव्हाळ
(अर्थात कुसुमाई)
९४२२८९२६१८
,९५७९११३५४७