आंडेर न सासर
नको ईचारु तू हर घडी
भलत्या शेतसवं पऱ्हेडी
भलती खानदान शे हाय येडी ना..ss
कसं व सांगु माडी..?
सासू ना भारी थाट,
मनासंगे वागे ताट.
हाय मारस भलती चाट ना..ss
कसं वं सांगू माडी..?
सासरा ना डोकाले ताप,
रोज खाये मटण-चाप.
रांधी-रांधीसन मुडी गयी कंबरनाss
कस वं सांगू माडी..?
नणंद शे नखरावाली,
धोवाले लावस नाली.
हाई भलतीच चाळावाली नाss
कस वं सांगू माडी..?
नवरा शे अक्करमाश्या,
हाटेलमा धोये बश्या..
घर येस साहेब जसा ना
कस वं सांगू माडी..?
नको ईचारु तू हर घडी
भलत्या शेतसव पऱ्हेडी
भलती खानदान शे हाय येडी ना
कसं व सांगु माडी
कवी.अनुकूल छाया माळी.
गाव: धुळे
(सध्या: डोंबिवली)
कवीसंमेलन 7 वे अखिल भारतीय अहिराणी संमेलन