आद्यात्म ahirani dialogue
दोस्तसवोन, यक गोट पक्की ध्यानम्हा ल्ह्या. आद्यात्म म्हनजे सोताले ठीक करनं. सोताना इचार सुधाराना. हायी आपला आत्माले जागाडानं इज्ञान शे. चमत्कार, जादु, आनी सिध्दीनं इज्ञान नही शे.
साधा सरळ आर्थ शे आद्यात्मना. सोताना इचार कशा चांगला ठेवाना यान्हज शिक्षन शे ते.
जर तुन्ही सोताना इचार येवस्थित करात ते इस्वास ठेवा तुम्हनी समश्या कितली बी मोठी र्हावु द्या ती त्यानत्यान्हीज सुटी जायी.
तुम्हनं आरोग्य ठीक र्हात नही ना ? चला मंग दखा आद्यात्म कशं काम करस. आपलं आरोग्य चांगलं र्हावा करता. यक दाव त्या सर्वा रोगसले (आजार) मी इचारं, ‘काय रे भो, तु आथा तथा फिरस. तुले वाटी त्याले लगेज धरी ल्हेस. आजारी पाडस.’
रोग म्हनाले लागनात, ‘नही नही दादा. आम्ही त्यासनाजकडे जातस ज्या आम्हले सोता व्हयीन बलावतस. मानुसनाज त्यान्हा सोतावर ताबा नही शे. मंग तो बलायीज ल्हेस आम्हले. मंग आम्हले बी जानज पडस ना.
तुम्ही कहीन आयकेल शे का ह्या रोगसनी कबुतरले धरी ल्हिदं. त्यासनी वांदरले धरी ल्हिदं. त्यासनाकडे नही जातत ह्या रोग. तुम्हनाजकडे काबर येतस. कारन तुम्हीज त्यासले आवतन देतस.
आरे, तुम्ही तुम्हनी जीभले लगाम घाला. आपला सर्वा इंद्रीय ताबाम्हा ठेवा. आपलं येळापत्रक बरबर करा. आन मंग दखा. ह्या रोग, ह्या बिमाऱ्या तुम्हनाकडे ढुकी बी दखनार नहीत.
(पंडीत श्रीराम शर्मा आचार्य.)
संकलन आणि भाषांतर :- अजय जी बिरारी नाशिक
जीभले चव लागस म्हनिसन तुम्ही काहीबाही खात र्हातस पन त्यान्हा बरबर हायी जीभ तुम्हनं आरोग्य बी खायी जास. ती आपलं रगत खास आनी मास बी खास. यासे कोन जबाबदार शे. जीवजंतु ? नही, तुम्ही सोताज.
जर तुम्ही जीभले ताबाम्हा ठीयं ते तुम्हले लिखापडी करी दिसु का तुम्हनाकडे कोनता बी आजार, रोग ढुकी दखनार नही.
मन्हासमोर आशा कितलाक उदाहरन शेतस का त्यासनी निसर्गना नियम पाळीसनी आपला आजारले दुर तंगाडी दिधं.
यक चंदीराम व्हता. त्याले आशा आजार व्हयना व्हता का खोकला कफमझारतीन त्यान्हं दररोज यक वाटीभर रगत निंघे. डाक्टरनी नही म्हनी दिनथं. डाक्टर म्हने हावु काही आते जगावु नही. यक सज्जन मानुसनी त्याले सांगं, ‘ जर तुले मरानज शे ते तु जशा आत्ते जगी र्हायना तशाज जग. पन जगनं व्हयी ते मी सांगस तशं कर. त्या सज्जननी काय सांगं चंदीरामले. जीभवर ताबा ठेवाले. विहार म्हनजे फिराले सांगं आनी त्याज बरबर व्यायाम कराले सांगा.
आपला चारीमेर प्राणशक्ती शे, ऊर्जा शे. ती ल्हेत र्हावानी साधं जेवन करानं आनी कमी खावानं.*
चंदीरामनी तशंज कयं आनी दखता दखता हावु चंदीराम प्रशिध्द पहिलवान चंदगीराम बनी गया.
(पंडित श्रीराम शर्मा आचार्य.)
संकलन व अहिराणी भाषांतर अजय जी बिरारी नाशिक
क्रमश: