माय मन्ह ऱ्हायी गय अहिराणी बोली कवीता

माय मन्ह ऱ्हायी गय अहिराणी बोली कवीता

माय मन्ह ऱ्हायी गय!

सदोदिन करी र्‍हाये
माडी नुस्त मन्हासाठे,
र्‍हायी गये व करानं
मन्ही माय तुन्हासाठे.

रात रात जागी र्‍हाये
याद शे समदी माले,
आसू गाळे टपटप
धिर धरायेना तुले.

तुन्हा पोटले चिमटा
दिन उराई ठे माले,
घरेदारे राबीसन
दुख सांगेना कोनले.

गंडा दोरा वैदवानी
आम्हलेज करी र्‍हाये,
तुन्हा दुखले मातर
पांघरून टाकी देये.

भेमकायी जाऊ जरा
माले बिलगी धराये,
उशी मांडी देवान ते
माय मन्ह र्‍हायी गये.

दूर नौकरीले धाड
शिकाडीन मोठ कय,
तुले आगीन देवान
माय मन्ह र्‍हायी गय.

तुन्ह सम व्हवान व
आत्ते उमजन माय,
यिस मन्हा पोटे माडी
सम्द करी घिसू बय.

काशीकन्या
सब्देस्ना पसारा
काव्यसंग्रह प्रकाशित