लाखी पुणी Ahirani boli kavita
लाखी पुणीना शुभेच्छा
लाखी पुणी
लाखी पुणीना सण
भाऊ बहिण जमण
एक धाग बंधण
कपायले चंदन. टिळा
बहीण भाऊ गोतावळा
जसा मना विठू सावळा
मुख दुःख वाहे वारा
शब्द मन गाभारा
बहीण आधार वारा
माय बाप कुडी
बहीण भाऊनी जोडी
माहेर वाट नागमोडी
बंधु वाडा मखमली
माय बाप तठे सावली
लेक माती दोन शब्द बोली चाली
रित भात माय माहेर वाट
लाखी पुणीले बहीण भाऊंना घाट
मना बंधु बसी चंदन पाट
बहीण भाऊ एकमेव
मना माय बापना ठेव
बंधुराजाले देवबा सुख ठेव
सविता पाटील मुंबई